Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Apmc Election Update : जालन्यातील पाच बाजार समित्यांसाठी ३७० अर्जांची विक्री

जालना जिल्ह्यातील मुदत संपलेल्या व प्रशासक लागू झालेल्या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Jalna News : जालना जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी २८ व ३० एप्रिलला प्रत्यक्ष मतदान (Election) होणार आहे. या पाचही बाजार समितीच्या प्रत्येकी १८ जागांसाठी बुधवार (ता. २९) पर्यंत ३७० अर्जांची विक्री झाली होती. तर पाचपैकी मंठा व आष्टी या दोन समित्यांमधून आठ अर्ज दाखल झाले होते.

जालना जिल्ह्यातील मुदत संपलेल्या व प्रशासक लागू झालेल्या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रम सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर झाला आहे.

यामध्ये अंबड, परतूर, परतूर तालुक्यातील आष्टी, घनसावंगी आणि मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. या बाजार समित्यांसाठी सोमवारपासून (ता. २७) नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यास सुरवात झाली.

२९ मार्चपर्यंत पाचही बाजार समितीमधील प्रत्येकी १८ जागांसाठी एकूण ३७० अर्जांची विक्री झाली होती. त्यामध्ये अंबड बाजार समितीसाठी ६९ परतूर १७ मंठा १७९ आष्टी ३१ घनसावंगी ७४ विक्री झालेल्या अर्जाचा समावेश होता.

दुसरीकडे पाच पैकी केवळ मंठा व आष्टी या दोन बाजार समित्यांमध्येच अनुक्रमे सात व एक मिळून आठ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. मंठा बाजार समितीत सोसायटी मतदारसंघातून दोन व्यापारी मतदारसंघातून तीन तर हमार तोलारी मतदारसंघातून दोन अर्जंट दाखल झाले होते.

दुसरीकडे आष्टी बाजार समितीत सोसायटी मतदारसंघातून एक अर्ज दाखल झाला होता.३ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. ५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार असून ६ ते २० एप्रिल दरम्यान नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असणार आहे.

त्यानंतर २१ एप्रिल रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. तर २८ एप्रिल रोजी परतूर, घनसावंगी बाजार समितीसाठी तर अंबड, आष्टी आणि मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

पाचही बाजार समितीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली गेली आहे.

त्यामध्ये अंबड बाजार समितीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परेश बेरा तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. बी. बावस्कर, परतुरसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रणव वाघमारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. बारगजे, आष्टी बाजार समितीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कल्पना शहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सई. जी. घावटे, मंठा बाजार समितीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय भोईटे तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. आर. राठोड व घनसावंगी बाजार समितीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक भिलारे काम पाहणार, असल्याचेही जिल्हा उपनिबंधक दाबशेडे यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT