Global Weather Forecast: प्रशांत महासागरात विकसित होत असलेली ‘एल निनो’ची स्थिती अभूतपूर्व तीव्र होण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) व्यक्त केली आहे. .नोव्हेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहू शकते. डिसेंबरमध्ये या स्थितीचा कळस गाठला जाण्याची शक्यता असून, जगभरातील तापमान आणि पावसावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतासह दक्षिण आणि आग्नेय आशियात नेहमीपेक्षा अधिक उष्णता वाढणार असून, पावसाची शक्यताही कमी आहे..Maharashtra Weather Alert: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; काही भागात पावसाची शक्यता .‘एल निनो’ ही ‘एल निनो सदर्न ऑसिलेशन’मधील (ईएनएसओ) तीन टप्प्यांपैकी एक स्थिती आहे. मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या तापमानातील बदल आणि त्यावरील वातावरणातील चढ-उतार हे या हवामानविषयक बदलांचे वैशिष्ट्य आहे..भारतावर परिणाम काय?भारतासह दक्षिण आशियातील बहुतांश भागांत कमाल आणि किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.ऑक्टोबर ते डिसेंबर हा दक्षिण भारतासाठी महत्त्वाचा पावसाचा काळ आहे. या काळात होणारा ईशान्य मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्याचा शेतीच्या कामांवर परिणाम होऊ शकतो..El Nino Impact: ‘एल निनो’मुळे राज्याच्या पावसात १९ टक्क्यांची तूट.पाऊस कमी झाल्यास पिकांच्या वाढीवर, जमिनीतील ओलाव्यावर आणि पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो.‘डब्ल्यूएमओ’च्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी ‘एल निनो’च्या संभाव्य तीव्रतेबाबत चिंता व्यक्त केली आहे..जगभरातील स्थिती?पूर्व आफ्रिका : सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता. अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा धोका.दक्षिण आफ्रिका : तुलनेने कमी पाऊस पडण्याचा अंदाज असून, दुष्काळाची चिंता वाढू शकते.उत्तर अमेरिका : अमेरिकेच्या वायव्य भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.दक्षिण अमेरिका : खंडाच्या पश्चिमेकडील दक्षिण भागांत पाऊस वाढण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.