Ashadhi Wari 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 : 'रामकृष्ण हरीचा जयघोषात' संत तुकाराम महाराजांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न

Sant Tukaram Maharaj Palkhi : विठुनामाचा जयघोषात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा पार पडला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विठू नामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात यंदाही लाखो वारकऱ्यांनी लाडक्या विठूरायाच्या ओढीने पंढरीची वाट धरली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. सणसण येथील मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे सोमवारी (ता.८) पार पडले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाच्या पहिल्या रिंगण सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी वारकऱ्यांसह परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तर विठोबा-रखुमाई आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता.

या दरम्यान पंढरपुरकडे चालणाऱ्या वैष्णवांना बेलवाडी येथे होणाऱ्या पहिल्या गोल अश्व रिंगण सोहळ्याची ओढ लागली होती. सोमवारी सकाळी कैलासवासी शहाजी मचाले यांच्या मेंढ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घातल्यानंतर झेंडेकऱ्यांसह पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी, टाळकरी आणि पखवाजकांनी प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर अश्वांचा रिंगण सोहळा सुरु झाला. यावेळी भव्य मैदानावर वैष्णवांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

पालखी सोहळ्यातील तुकाराम महाराज देवस्थानचा अश्व व मोहिते पाटलांचा अश्व या दोन्ही अश्वानी वायुवेगाने पालखी रथाला तीन प्रदक्षिणा घातल्या. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरासह ग्यानबा-तुकारामचा जयघोष झाला. तर रिंगणात धावणाऱ्या अश्वांच्या पावलांची धूळीचा टीळा लल्लाटी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. या नयनरम्य सोहळ्यानंतर वैष्णवांचा मेळ्याचा रिंगण स्थळावर खेळ रंगला. यावेळी अबाल वृद्धांनी टाळ मृदंगाच्या गजरात फुगड्या घालत ठेका धरला.

रिंगण सोहळ्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुकांची आरती करण्यात आली. तर येथील हनुमान मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी पालखीचा विसावा ठेवण्यात आली. तर दुपारच्या विश्रांतीनंतर पालखी वैष्णवांच्याी मेळ्यासह अंथुर्णे मुक्कामी मार्रगस्थ झाली.

पालखी सोहळ्याचा त्रिशतकोत्तर

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे हे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष असून ३३८ वा पालखी सोहळा आहे. तर या सोहळ्यात ३७९ दिंड्यांनी सहभाग घेतला आहे. १ लाखांहून अधिक वैष्णव पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून पुढे ही संख्या वाढत जाईल, असे मुख्य विश्वस्त भानुदास मोरे महाराज यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT