Aslam Abdul Shanedivan
आषाढी वारीला सुरूवात झाली असून काहीच दिवसांत राज्यभरातील मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतील
देहू येथून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे
यादरम्यान जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी व संविधान दिंडी बारामतीत पोहचली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निंबूत ता. बारामती येथे श्री संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. तसेच पालखी रथाची धुरा हाती घेतली
यादरम्यान अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील पालखी सोहळ्यात हजेरी लावली. तसेच हरिभक्तांसाठी चपात्या लाटल्या.
दरम्यान आमदार रोहीत पवार यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात फुगडीचा फेरा धरला