Ravikant Tupkar Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला सदाभाऊ खोत यांचा पाठिंबा

Ravikant Tupkar Protest : सोयाबीन व कापूस दराच्या प्रश्नासाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरुवात केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला.

Swapnil Shinde

Buldhana News : सोयाबीन, कापसाला चांगला दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सोमठाना गावात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपासून सोयाबीन-कापूस दरवाढ, दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी १० रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्याची लाभ मिळावा, आदी मागण्यासाठी एल्गार मोर्चा काढला. या मोर्चाच्या सांगता सभेत त्यांनी आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाचा ताबा घेणार असल्याचा इशारा दिला.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तुपकरांना ताब्यात घेतले होते. सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ तुपकर यांनी दोन दिवसांपूर्वी सोमठाणा, ता. चिखली येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT