Rythu Bharosa Kendras (RBKs) in the State to supply seed, fertilizers, and seedlings to agriculture, aquaculture, and horticulture farmers 
ॲग्रो विशेष

काय आहे शेतकऱ्यांसाठीची रयतु भरोसा केंद्र योजना ?

शेतकऱ्यांच्या खते, बी-बियाणे, कीडनाशके, शेतीमालासाठी बाजारपेठ अशा अनेक गरजांची एकाच ठिकाणी पूर्तता करणारी आंध्र प्रदेशातील रयतु भरोसा केंद्र ही त्या राज्याच्या कृषी विभागाची आगळीवेगळी ओळख बनली आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदीपासून ते त्यांच्या पिकांना रास्त दर मिळवून देण्यासाठी माहिती देणे, पिकांबाबत मार्गदर्शक करण्याचे कामही रयतु भरोसा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना वित्तपुरवठ्याचे काम या केंद्रांकडून करण्यात येत आहे.

Team Agrowon

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पेरण्यांपूर्वी खतं, रसायने, बी-बियाणे इत्यादींची तयारी करावी लागते. त्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊन या सगळ्यांची खरेदी करावी लागते. तसे आंध्र प्रदेशात शेतकऱ्यांना ही धावाधाव करण्याची गरज नसते. कारण त्यांच्या रयतु भरोसा केंद्रामार्फत (Rythu Bharosa Kendra)या गोष्टी शेतकऱ्यांना पुरवण्यात येतात. शेतकऱ्यांच्या खते, बी-बियाणे, कीडनाशके, शेतीमालासाठी बाजारपेठ अशा अनेक गरजांची एकाच ठिकाणी पूर्तता करणारी आंध्र प्रदेशातील रयतु भरोसा केंद्र ही त्या राज्याच्या कृषी विभागाची आगळीवेगळी ओळख बनली आहेत.

शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदीपासून ते त्यांच्या पिकांना रास्त दर मिळवून देण्यासाठी माहिती देणे, पिकांबाबत मार्गदर्शक करण्याचे कामही रयतु भरोसा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना वित्तपुरवठ्याचे काम या केंद्रांकडून करण्यात येत आहे. एवढंच काय तर या रयतु भरोसा केंद्रांची (Rythu Bharosa Kendra)स्वतःची एटीएमही आहेत. रयतु भरोसा केंद्रांच्या १३ एटीएमना उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दलचे आयएसओ ISO प्रमाणपत्रही मिळालेले आहे.

शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी म्हणून आंध्राचे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगन मोहन रेड्डी यांनी राज्यभरात अशी १२ हजार केंद्र उभारण्याचा संकल्प सोडलेला आहे.मुळात शेती व शेतकऱ्यांच्या आवश्यक गरजांची एकाच छताखाली पूर्तता करणारी केंद्र म्हणजे रयतु भरोसा केंद्र.

आता इतकी सगळी कामं या केंद्रांकडून केली जात असतील तर स्वाभाविकच या विभागाला स्वतःचा असा निधी असणारच ना ? तुमच्या मनातील ही शंकाही अगदी रास्त आहे. राज्य सरकारकडून या रयतु भरोसा केंद्रांसाठी (Rythu Bharosa Kendra)म्हणून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची तरतुदी केली जात असते. अगदी आंध्र प्रदेश सरकारच्या २०२२-२०२३ या आर्थिक वर्षांसाठीच्या अर्थसंकल्पातही रयतु भरोसा केंद्रांसाठी ७०२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या अडीच वर्षांत सरकारने कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी १. १० लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातील २०,११७ कोटी रुपयांचा निधी या रयतु भरोसा केंद्रांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे कारण शेतकऱ्यांना शक्य त्या सेवा-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी केंद्र म्हणून रयतु भरोसा केंद्रांचा (Rythu Bharosa Kendra) बोलबाला होतोय. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर इतर राज्यांच्या कृषी विभागानेही अशी संकल्पना राबवावी, अशी शिफारसही केली जाते.

शेतकऱ्यांच्या माती परीक्षण, पीकपद्धतीतलया अडी-अडचणी सोडवण्यासाठी लागणारे शास्त्रीय, तांत्रिक सहकार्यही या रयतु भरोसा केंद्राकडे (Rythu Bharosa Kendra)उपलब्ध असते. स्थानिक केंद्राशी जोडल्या गेलेली कृषी अभ्यासकांची, तंत्रज्ञांची मदत या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते.

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेत जसे शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये देण्यात येतात या योजनेसारखीच वायएसआर रयतु भरोसा (YSR Rythu Bharosa) योजना राबवली जाते ज्यात शेतकऱ्यांना वर्षाकाठी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ७५०० रुपये देण्यात येतात. अर्थात या योजनेचाही शेतकऱ्यांना लाभ होत असला तरी रयतु भरोसा केंद्र या आंध्र प्रदेश सरकारच्या आगळीवेगळ्या योजनेमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना लाभ होतोय, हे निश्चित.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT