Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road : पाणंद रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा

Rural Development : शेतरस्ते हा शेतकऱ्यांचा प्रगतीचा मार्ग आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोचण्यासाठी आणि शेतातील उत्पादित माल बाजारपेठेपर्यंत पोचविण्यासाठी शेतशिवारातील पाणंद रस्ते चांगले करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Dharashiv News : शेतरस्ते हा शेतकऱ्यांचा प्रगतीचा मार्ग आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोचण्यासाठी आणि शेतातील उत्पादित माल बाजारपेठेपर्यंत पोचविण्यासाठी शेतशिवारातील पाणंद रस्ते चांगले करणे आवश्यक आहे. विविध योजनांच्या अभिसरणातून पाणंद रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा द्यावी, असे निर्देश देताना जिल्ह्यात यंदा पन्नास लाख वृक्षांच्या लागवडीची मोहीम यंत्रणांनी प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजना व वृक्ष लागवड मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनांक घोष, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

उन्हाळा असल्याने मातोश्री पाणंद रस्ते तयार करता येतील. हे रस्ते तयार करण्याचा कालावधी अडीच ते तीन महिने आहे. हे रस्ते उत्तम दर्जाचे तयार करावेत. तांत्रिकदृष्ट्या ते परिपूर्ण असावेत. या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. तालुकास्तरीय यंत्रणांच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, या कामाला गती द्यावी.

विविध यंत्रणांनी नागरिकांना वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी करून घ्यावे. प्रत्येकाने एक वृक्ष लावावा. या वृक्षांचे तीन वर्षे संगोपन करावे. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्याच्या बाजूला, गायरान जमिनीवर वृक्ष लागवड करावी. वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करण्याचे काम सुरू करावे. रोपे घेण्याचे नियोजन आतापासूनच करावे. यंत्रणांनी वृक्ष लागवडीसोबतच संगोपनाची जबाबदारी पार पाडावी, आदी सूचना त्यांनी जिल्हाधिकारी पुजार यांनी दिल्या.

गाळासाठी पात्र शेतकऱ्यांना अनुदान

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. हा गाळ शेतात टाकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. गाळ वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. तलाव परिसरात त्यासाठी लक्ष ठेवावे. गाळ काढण्यासाठी अशासकीय संस्थांना मशिन भाडे व इंधन भाडे देण्यात येईल. शेतकऱ्यांनी काढलेला गाळ स्वतःहून शेतात टाकावा. पात्र शेतकऱ्यांना गाळासाठी एकरी पंधरा हजार रुपये अनुदान एक एकपर्यंत देण्यात येईल, असे पुजारी यावेळी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT