Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान

Cow Milk Rate : ही योजना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : विभागातील व जिल्ह्यातील सहकारी दूध संघ, खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागामार्फत राबविण्यात येत, असल्याची माहिती प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी रि. भा. मते यांनी दिली आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ, खासगी प्रकल्प यांना गाईचे दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय ५ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला.

ही योजना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संबंधित संघ व खासगी प्रकल्प यांनी ३.५ फॅट/८.५ एस.एन.एफ. या गुणप्रतिच्या दुधासाठी प्रति लिटर २७ रुपये दर देणे आवश्यक आहे. किमान ३.२ फॅट/८.५ एस.एन.एफ. पर्यंतच्या दुधासाठी ही योजना लागू आहे. त्यापेक्षा कमी अथवा जास्त गुणप्रत असल्यास प्रत्येकी ३० पैसे प्रमाणे वजावट अथवा वाढ करणे आवश्यक आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून प्रति लिटर पाच रुपये अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. थेट बॅंक खात्यात अनुदान जमा होण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्याचे बॅंक खाते आधार कार्ड व ईयर टॅगशी जोडलेले असणे आवश्यक असून, त्याची भारतीय पशुधन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. दूध पुरवठा करणाऱ्या पशुपालकांनी आपल्या जनावरांचे टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी रि. भा. मते यांनी केले आहे.

६१ संस्थांना गाईचे दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ

विभागातील एकूण १२ सहकारी संघ, एक मल्टिस्टेट संघ, २ फार्मर प्रोड्यूसर कंपनी, ४६ खासगी दूध प्रकल्प अशा एकूण ६१ संस्थांना गाईचे दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल. पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे ईअर टॅगिंग मोहीम राबविण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT