Agriculture Electricity agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity Scheme : बळीराजा वीज सवलत योजनेत ४६ कोटी रुपये वीजबिल माफी

Agriculture Pump Bill : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांचे सुमारे ४६ कोटी रुपये वीजबिल माफ करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Hingoli News : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांचे सुमारे ४६ कोटी रुपये वीजबिल माफ करण्यात येणार आहे. या योजनेचा ७६ हजार ५६६ कृषी पंप धारकांना लाभ मिळू शकेल. हिंगोली जिल्ह्यात महावितरण अंतर्गंत यंदाच्या ३० जून अखेर ७.५ अश्वशक्ती (एच. पी.) पर्यंत ७६ हजार ५६६ एवढे कृषीपंप ग्राहक आहेत.

त्यात हिंगोली तालुक्यातील १२ हजार ७२०, कळमनुरी तालुक्यातील १४ हजार २०१, वसमत तालुक्यात २१ हजार २९२, औंढा नागनाथ तालुक्यातील १२ हजार ३५९, सेनगाव तालुक्यातील १५ हजार ९९४ कृषी पंपाचा समावेश आहे. या सर्व कृषीपंप ग्राहकांना महावितरण कंपनीकडून दर तीन महिन्याला वीज बिल देण्यात येतात.

२०२३-२४ मध्ये हिंगोली तालुक्यातील २७ कोटी ७६ लाख रुपये, कळमनुरी तालुक्यातील ३६ कोटी ५८ लाख रुपये, वसमत तालुक्यातील ४८ कोटी १६ लाख रुपये, औंढा नागनाथ तालुक्यातील २४ कोटी ७४ लाख रुपये, सेनगाव तालुक्यातील ३४ कोटी ८ लाख रुपये मिळून जिल्ह्यातील एकूण ७६ हजार ५६६ कृषीपंपाचे वीज बिल १७१ कोटी ३२ लाख रुपये आहे.

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना २०२४ योजनेअंतर्गंत ७.५ अश्वशक्तीपर्यंत कृषीपंप धारक शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे.

ही योजना एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ या ५ वर्षासाठी राबविण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती महावितरणच्या हिंगोली मंडलाचे अधीक्षक अभियंता यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

Agriculture Minister Field Visit: कृषिमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी

Grape Farmer Support: पोलिसांच्या दणक्याने द्राक्ष शेतकऱ्यांचे ६५ लाख परत

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

SCROLL FOR NEXT