Crop Damage
Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Help : सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधितांना १७.०४ कोटी रुपयांची मदत

विकास जाधव 

Satara News : गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान (Havey Rain) झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे.

जिल्ह्यातील २४ हजार ७५४ शेतकऱ्यांना १७ कोटी चार लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे भरपाईच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गतवर्षातील सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदूरबार,जळगाव, अहमदनगर जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली होती.

यामध्ये खरीप पिकांसह नगदी पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतातील पिके जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले होते.

हाताला आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करून त्वरित अहवाल पाठविण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठविले होते.

मात्र पाच ते सहा महिने उलटले तरी मदत मिळाली नव्हती. याबाबत दैनिक ‘ॲग्रोवन’ने जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते.

भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत होती. याची दखल घेऊन शासनाने तब्बल पाच ते सहा महिन्यांनी पुणे व नाशिक विभागातील सहा लाख ३२ हजार ८९२ शेतकऱ्यांना तब्बल ६७५ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

यामध्ये तीन हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार असून, जिरायतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी २७ हजार व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ३६ हजार रुपये या वाढीव दराप्रमाणे देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : शिर्डीतल्या तिरंगी लढतीकडे लागले राज्याचे लक्ष

Unauthorized Seed Stock : एक लाख रुपयांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त

Pre Monsoon Rain : वादळी वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण

Millet Crop : भरडधान्याची पिके वाढून विकास होईल; नांदेड येथे मराठवाड्यातील भरडधान्य पिक परिषदेत तज्ज्ञांचा आशावाद

Fodder Production : चारा पिकांच्या क्षेत्रात तीन हजार हेक्टरने वाढ

SCROLL FOR NEXT