Crop Damage Compensation : केवळ १ टक्क्यांसाठी रखडली नुकसान भरपाई ; नुकसानीचे ९९ टक्के पंचनामे पूर्ण

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाड्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे जवळपास ९९ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Crop Damage Compensation : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळे (Hailstorm) मराठवाड्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले होते.

या नुकसानीचे जवळपास ९९ टक्के पंचनामे (Crop Damage Survey) पूर्ण झाले आहेत. मात्र, केवळ एक टक्के नुकसानग्रस्त भागातील पंचनामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई (Compensation) मिळालेली नाही.

विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच पंचनामे अपूर्ण राहिले आहेत.

राज्याच्या विविध भागात मार्च महिन्यादरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. यामध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळीमुळे एक लाख २२ हजार ३५ शेतकऱ्यांच्या ६० हजार ८१९ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये जिरायती, बागायती आणि फळपिकांचाही समावेश आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांना आता दुप्पट मदत नाही

नुकसानग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे तातडीने करून गुढीपाडव्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे आश्वासन अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री आणि सरकारच्यावतीने देण्यात आले होते. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करतेय का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

Crop Damage
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्त बाधित शेतकऱ्यांना ७३ कोटी रुपये नुकसान भरपाई

एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. १०० टक्के पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे प्रशासनाकडून नुकसान भरपाईसंदर्भातील पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना नेमकी किती मदत जाहीर केली जाणार आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसान भरपाईसाठी दोन कोटींच्या मदतीचा प्रस्ताव

तसेच जाहीर झालेली मदत नक्की कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही मदत अजूनही पंचनामे अपूर्ण राहिल्यामुळे अडकली आहे.

दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाड्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, सुरूवातीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्यासाठी अडचणी येत होत्या.

परंतु आता नुकसानीचे जवळपास ९९ टक्के पूर्ण झाले आहेत. केवळ एक टक्के पंचनामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचणी येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com