Land Measurement Agrowon
ॲग्रो विशेष

Rover Technology : भूकरमापकांना मोजणीसाठी रोव्हर यंत्रणा पुरविणार

Land Measurement Technology : राज्य शासनाने नियमित मोजणीसाठी ९० दिवसांची, तर द्रुतगती मोजणीसाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये मोजणी पूर्ण करणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : राज्य शासनाने नियमित मोजणीसाठी ९० दिवसांची, तर द्रुतगती मोजणीसाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये मोजणी पूर्ण करणार असल्याचे शासनाने म्हटले आहे. जमीन मोजणीची प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी सर्व भूकरमापकांना मोजणीसाठी रोव्हर यंत्रणा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे, तर कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० सेंकदांत घेता येणार आहे. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह घेत असून, हे रीडिंग टॅबमध्ये दिसते.

राज्यात भूमिअभिलेख विभागाची ३५५ कार्यालये असून, या कार्यालयांमध्ये रोव्हर मशिन उपलब्ध करून देण्यास भूमिअभिलेख विभागाने पुढाकार घेतला आहे.

रोव्हर मशिन हे प्राधान्याने ज्या तालुक्यांमध्ये जमीन मोजणीची सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याठिकाणी दिले जाणार आहे. यामुळे त्या कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लवकर होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

Bhama Askhed Dam: भामा-आसखेडचे आवर्तन लांबणीवर

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

SCROLL FOR NEXT