Land Measurement System : जमीन मोजणीची प्रणाली अद्ययावत

E-Mojni Version 2.0 : जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देणारी ई-मोजणी व्हर्जन २.० ही अद्ययावत संगणकप्रणाली एक सप्टेंबरपासून पूर्ण राज्यात लागू करण्यात येईल.
E-Mojni Version 2.0
E-Mojni Version 2.0 Agrowon
Published on
Updated on

Pune News : जमीनधारकांना मोजणीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आणि शुल्क भरणे यासह दाखल अर्जाच्या प्रगतीबाबत एसएमएसद्वारे माहिती देणारी तसेच मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देणारी ई-मोजणी व्हर्जन २.० ही अद्ययावत संगणकप्रणाली एक सप्टेंबरपासून पूर्ण राज्यात लागू करण्यात येईल.

भूमी अभिलेख विभागाने ही संगणकप्रणाली अद्ययावत केली आहे. ई-मोजणी २.० हे नव्या प्रणालीचे नाव आहे. यामध्ये जमिनीची हद्दकायम, पोटहिस्सा, बिनशेती, कोर्टवाटप व कोर्टकमिशन व विविध प्रकल्पांकरिता भूमिसंपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जाते. दाखल होणाऱ्या मोजणी अर्जातील जमिनींची मोजणी ‘जीआयएस’आधारित रोव्हर्सद्वारे करण्यात येईल. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक जमिनींच्या हद्दीचे अक्षांश व रेखांशाची माहिती प्राप्त होईल. परिणामी, जमीन मोजणी प्रकरणांत मानवी चुकांमुळे हद्दीबाबत होणाऱ्या चुका अथवा दोन मोजणींमुळे हद्दीत अंतर पडणे यांसारखे वाद अथवा तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

E-Mojni Version 2.0
E-mojani 2.0 : शेतकऱ्यांनो जमीन मोजणीची चिंता मिटली, एक तासात अचूक होणार मोजमाप, जाणून घ्या ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’

एका वर्षांपूर्वी या प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस नंदुरबार व वाशीम या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर सुरू करण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात ही प्रणाली लागू करण्यात आली.

E-Mojni Version 2.0
Agristack Project : जमीन विक्रीच्या व्यवहारांमध्ये अडथळे होणार दूर; राज्यात राबवला जाणार 'अॅग्रिस्टॅक' प्रकल्प

यामध्ये पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात मोजणीची कामे सुरू करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्हे आणि तालुक्यांत ती लागू करण्यात आली. संपूर्ण राज्यात ही संगणकप्रणाली लागू करण्याचा आदेश भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांनी काढला आहे.

ई मोजणी व्हर्जन २.० ची वैशिष्ट्ये

जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार

मोजणी फी ऑनलाइन भरण्याची सुविधा

अर्जाची सद्यःस्थिती एमएमएसने कळणार

जमीन मोजणी प्रत ऑनलाइन मिळणार

मोजणीच्या नकाशावर अक्षांश-रेखांशाची माहिती असणार

जमिनीचे ‘लोकेशन’सुद्धा कळणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com