River Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Nandini River Revival : नंदिनी नदी पुनरुज्जीवीकरण अभियान

River Conservation : अंजनेरी येथे उगम पावणाऱ्या नंदिनी नदीला विशेष महत्त्व आहे. मात्र, काही ठिकाणी तिचे नाल्यात रूपांतर झाले आहे. या नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे.

Team Agrowon

Nashik News : अंजनेरी येथे उगम पावणाऱ्या नंदिनी नदीला विशेष महत्त्व आहे. मात्र, काही ठिकाणी तिचे नाल्यात रूपांतर झाले आहे. या नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे.अक्रोन प्लास्टकडून मिळालेल्या सीएसआर निधीतून महिरावणी येथे नंदिनी नदी पुनरुज्जीवीकरण अभियान हाती घेण्यात आले आहे.

रोटरी क्लब नाशिकच्या वतीने दरवर्षी ग्रामीण भागातील नदी, नाले, ओहोळ तसेच बंधाऱ्यातील गाळ काढून पाणीसाठा वाढवण्याचे काम केले जाते. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन शेतकरी पशुपक्षी, प्राणी व पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होतो. या वर्षी या कामासाठी नंदिनी नदी निवडण्यात आली आहे.

नदीच्या वहन मार्गात महिरावणी गावाजवळ मोठ्या प्रमाणात गाळ साचून पाणीसाठा कमी झालेला आहे. येथे रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या ८० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरीचे डिस्ट्रिक्ट प्रांतपाल राजेंद्रसिंह खुराणा यांच्या हस्ते या मोहिमेस सुरवात करण्यात आली.

या कार्यासाठी बेळगाव ढगा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढगे आणि महिरावणी येथील सरपंच आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे पाठपुरावा केला होता. या नदीतील गाळ उपसा करण्यासह कचरा काढण्यात येणार आहे.

या वेळी रोटरीचे अध्यक्ष ओम प्रकाश रावत, प्रकल्प सचिव प्रा. हेमराज राजपूत, रोटरी सचिव शिल्पा पारख, उपप्रांतपाल ओंकार महाले, विनायक देवधर, सुजाता राजेबहादुर, विजय पंडित, वैशाली रावत, सरपंच कचरु वागळे, उपसरपंच सोमनाथ खांडबहाले, ग्रामसेविका श्रीमती मोरे, समाधान खांडबहाले, सोमनाथ खांडबहाले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पाण्याच्या भूपातळीत वाढ होणार

याआधीही रोटरी क्लब ऑफ नाशिकने बेळगाव ढगा येथे पाझर तलाव खोलीकरण हाती घेतले होते. या कामामुळे छोट्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन इथल्या ग्रामस्थांना फायदे झाले आहे.

नदी पुनरुज्जीवीकरण कार्यामुळे ही नदी पुन्हा पूर्वीसारखी प्रवाहित होणार असून नदीकाठी असणाऱ्या शेतजमिनींसाठी पाणी तर उपलब्ध होईलच पण येथील पाण्याच्या भूपातळीतही नक्कीच वाढ होईल. हा प्रकल्प रोटरीसाठी आस्थेचा विषय असून आम्ही हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी पूर्ण क्षमतेचा वापर करू, असे आश्‍वासन रोटरीचे अध्यक्ष ओम प्रकाश रावत, प्रकल्प सचिव प्रा. हेमराज राजपूत यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT