Women's Day Agrowon
ॲग्रो विशेष

Women's Day : शाश्‍वत विकासासाठी स्त्रियांची भूमिका महत्त्वाची

कृषी विज्ञान केंद्रामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. उद्याच्या शास्वततेसाठी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व पटवून दिले.

Team Agrowon

Akola News : ‘आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असून, ज्ञान आणि कौशल्याच्या आधारावर सर्व क्षेत्र त्यांनी काबीज केले आहेत,’’ असे प्रतिपादन ‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांनी केले.

जागतिक महिलादिनी (Women's Day) आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उज्ज्वला मापारी, प्रा. डॉ. संध्या काळे, जिल्हा समुपदेशक नीता जाधव यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात केव्हीकेच्या गृहविज्ञान विषय विशेषज्ज्ञ कीर्ती देशमुख यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. उद्याच्या शास्वततेसाठी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व पटवून दिले.

डॉ. मापारी यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबत बोलताना स्त्रियांच्या वाढत्या वयासोबत शरीरात होणारे बदल, उत्पन्न होणाऱ्या व्याधी, त्याबाबतीत घ्यावयाची काळजी, दुर्लक्ष केल्याने होणारे अपाय व करता येण्यासारखे उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

महिलांनी दररोज आपल्या इतर कामांसोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताना नियमित व्यायाम, प्राणायाम, उत्तम पोषक आहार आणि भरडधान्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा असे आवर्जून सांगितले.

नीता जाधव यांनी सर्व महिलांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात महिलांनी आपला ताण-तणाव बाजूला ठेवून सकारात्मक विचार अंगीकारून आपल्या स्वतःचा व कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन केले.

घरातील स्त्री जर तणावमुक्त आणि आनंदी राहिली, तर ती घराला पुढे नेऊन आपल्या स्वतःचा व घराचा सुद्धा विकास साधण्यामध्ये अव्वल ठरू शकते, असे अनेक स्पष्ट केले. डॉ. संध्या काळे यांनी महिला सक्षमीकरणाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.

कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकारी ज्योती चोरे यांनी महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करून कृषी अन्न प्रक्रिया व मूल्यवर्धन तसेच शासनाच्या विविध योजनांच्या प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती दिली.

आरती संतोष पाठक, ज्योती महल्ले, उषा खोपे व ज्योत्स्ना बाजट या यशस्वी महिलांचा सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व शाल देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन करीत गजानन तुपकर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT