Rohit Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Rohit Pawar : शासकीय आश्रमशाळेत कोट्यवधींचा दूध घोटाळा ; रोहित पवारांचे गंभीर आरोप

Milk Scam In Asharam School : राज्यातील शासकीय आश्रमशाळेत दूध घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील शासकीय आश्रमशाळेत दूध घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पवार यांनी राज्य सरकारवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने आपल्या ऑफिसमध्ये घोटाळ्याशी संबंधित फाईल ठेवल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी घोटाळ्यासंदर्भातील आकडेवारीही जाहीर केली.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, मला एका अज्ञात व्यक्तीने ११ फाईल्स पाठविल्या आहेत. त्यापैकी दोन फाईल्स मी आणल्या आहेत. ज्यामध्ये महत्त्वाच्या खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती आहे. पहिल्या फाईलमध्ये दूध घोटाळ्याची माहिती आहे. राज्यात ५५२ आश्रम शाळा आहेत. या आश्रम शाळेत एकूण १ लाख ८७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५० मीली दूध देणे आवश्यक आहे.

एखाद्या संस्थेला दूध पुरवठा करायचा असेल तर त्यासाठी करार केला पाहिजे. पहिल्या करारात अमुल, चितळेकडून दूध घ्यायला हरकत नाही, असे म्हटले आहे. त्यासाठी दोन कंपन्यांशी करार २०१८-१९ साली आणि दुसरा करार २०२३-२४ दरम्यान झाला. पहिल्या करार झाला तेव्हा दुधाचा दर ४६.४९ रुपये लीटर असा होता.

तर अमुलसाठी ४९.७५ रुपये करार झाला होता. २०२३०२४ मध्ये अशाच प्रकारचे टेंडर काढले जे १६४ कोटींचे आहे. यात ५ कोटी ७१ लाख पॅकेट्स घ्यायचे होते. २०२३-२४ मध्ये १४६ रुपये प्रतिलिटर दराने कंत्राटदाराला पैसे देण्यात आल्याचे पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून ३० रुपये प्रति लिटर तर टेट्रा पॅक ५५ रुपये दराने खरेदी करायला पाहिजे होते. यासाठी ८५ कोटी रुपये खर्च झाले असते. पण प्रत्यक्षात १६५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

यामध्ये ८० कोटींची दलाली देण्यात आली असून या कामासाठी आंबेगाव तालुक्यातील एका खासगी दूध उत्पादक संस्था आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. सत्तेत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका नेत्याला हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

दरम्यान, अतिरिक्त ८० कोटी रिपये दिले आहेत ते सरकार परत घेणार का? असा सवाल पवार यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्याबाबतचे पंतप्रधान कार्यालयाला देणार असून या दोन कंपन्या कोणाच्या आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, असेही पवार यावेळी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lasunghas cultivation: पौष्टिक लसूणघास चारा पिकाचे लागवड तंत्र

Winter Cow Care: हिवाळ्यातील संकरित गाईंच्या आरोग्याचे व्यवस्थापन

Solar Irrigation: वीज नसली तरी द्या पिकांना पाणी; सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी फायद्याची

Rabi Season: जमिनी वाफशाला; रब्बीची तयारी सुरू

India Urea Plant in Russia: रशियात भारताचा पहिला युरिया प्रकल्प, चीनच्या निर्यात निर्बंधांनंतर उचलले मोठे पाऊल

SCROLL FOR NEXT