Latur News: खरीप हंगामात तांत्रिक कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ पोर्टलवर आपल्या पिकांची नोंदणी करता आलेली नाही, त्यांच्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आता ऑफलाइन पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. .शेतकऱ्यांनी १७ ते २४ डिसेंबरदरम्यान आपापल्या गावच्या तलाठ्यांकडे अर्ज करावेत, असे आवाहन अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच ई-पीक पाहणी पोर्टलवर यशस्वीरीत्या नोंदणी केलेली आहे, त्यांच्या नोंदीमध्ये कोणतीही दुरुस्ती या प्रक्रियेद्वारे केली जाणार नाही..E Crop Survey: मुदतीत नोंद न झालेल्या पिकांची आता ऑफलाइन पाहणी.ही सुविधा केवळ ज्यांची नोंदणी पूर्णपणे राहिलेली आहे, अशाच शेतकऱ्यांसाठी असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे. याबाबत जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे..E Crop Survey: ई-पीक पाहणीला महिनाभर मुदतवाढ.अर्जाची मुदत : १७ ते २४ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे लेखी अर्ज सादर करावे.ग्रामस्तरीय समिती : अर्जांची छाननी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यात तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी सहायकांचा समावेश आहे..प्रत्यक्ष स्थळ पाहणी : २५ डिसेंबर ते ७ जानेवारीदरम्यान ही समिती प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करेल.पंचनामा प्रक्रिया : पाहणीपूर्वी शेजारील ४, ५ शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिली जाईल. स्थळ पाहणीवेळी बियाणे, खते खरेदीच्या पावत्या, मागील नोंदी आणि स्थानिक चौकशी करून पंचनामा केला जाईल..तालुक्यातील एकाही पात्र शेतकऱ्याची पीक नोंदणी राहू नये, हा प्रशासनाचा उद्देश आहे. तरी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज तलाठी कार्यालयात जमा करावेत.- उज्ज्वला पांगरकर, तहसीलदार, अहमदपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.