Amravati News: थबबाकीदारांविरोधात कठोर पवित्रा घेत त्यांच्याविरोधात महावितरणने धडक कारवाईस सुरूवात केली आहे. या कारवाईत ३९ कोटी ५३ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी ३३ हजार ८४५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला..महावितरणच्या म्हणण्यानुसार, वीज ही अत्यावश्यक सेवा असूनही परिमंडळातील हजारो वीजग्राहक वीजबिल भरण्यास चालढकल करतात. त्यामुळे महावितरणने धडक मोहीम राबवीत कारवाईला सुरवात केली आहे. हजारो वीजग्राहक वीजबिल भरण्याला प्राधान्यच देत नाही. .Power Sopply Disconnect : महावितरणटी 'मार्चएण्ड' लक्ष्यपूर्ती मोहीम वेगात ; अडीच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित.शिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. परिणामी परिमंडळात दिवसेंदिवस महावितरणच्या थकबाकीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याचे २२ दिवस संपूनही वीजबिलाची वसुली डिसेंबर महिन्याच्या डिमांडच्या ६२ टक्के आणि एकूण थकबाकीच्या २८ टक्के झाली आहे..त्यामुळे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी वसुलीबाबत विभागनिहाय आढावा घेऊन थकीत वीजबिलाच्या वसुलीसोबत थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी कारवाईच करावी आणि त्याची नोंद ऑनलाइन पोर्टलमध्ये करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्य अभियंता यांनी दिल्या आहेत. .Power Supply Disconnect : एकावन्न हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित.वीजपुरवठा खंडित केल्यानंतर त्या ग्राहकाची नोंद ऑनलाइन केल्यानंतर, सुरक्षा ठेवीसह संपूर्ण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय त्या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा पूर्ववत करता येत नाही. सिंगल फेज ग्राहकांना भुर्दंड म्हणून ३१० आणि थ्री फेज ग्राहकाला ५३० रुपयांचे पुनर्जोडणी शुल्क आकारण्यात येते..वीजबिल वसुलीत अमरावती परिमंडळ शेवटून तिसरेराज्यात महावितरणचे १६ परिमंडळ आहेत. परंतु वीजबिल वसुलीबाबत अमरावती परिमंडळाचा चौदावा क्रमांक लागतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.