Rohit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Rohit Pawar : ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'संघर्षाचीही तयारी...'

Rohit Pawar on ED raids : रोहित पवार यांच्या अॅग्रो कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या बारामती येथील कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ट्विट करत यावर सुचक प्रतिक्रिया दिली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी (ता. ५ रोजी) ईडीने छापा टाकला आहे. यावरून रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी,'प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल', असं म्हटलं आहे.

त्यांनी ट्विट करत “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल,” असं म्हटलं आहे.

ईडीने आज मुंबईसह इतर सहा ठिकाणी छापेमारी केली. दरम्यान ईडीच्या एका पथकाकडून रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कंपनीवर सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान छापेमारी करण्यात आली. यानंतर रोहित पवार यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादीचे नेतेही सरसावले

रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कंपनीवर ईडीने छापेमारी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेतेही सरसावले आहेत. त्यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांनी यावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आमदार अनिल देशमुख

राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी ट्विट करत, 'रोहीत, आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य तयार करत असतो. लढायचं - भिडायचं! #झुकेंगे_नहीं!', असे म्हटलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे

तर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, 'ईडी आणि सीबीआयनं टाकलेल्या धाडीतील ९५ टक्के लोक विरोधी पक्षातील आहेत. त्यामुळे छापेमारीचं आम्हाला यात काही आश्चर्य वाटलं नाही', असे म्हटलं आहे.

'ही पहिली वेळ नाही. यापूर्वी माझ्या बहिणींच्या घरावर देखील ईडीची छापेमारी झाली आहे. आता रोहित पवारांवर होत, असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड

दरम्यान यावरून माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यांवर नाव न घेता घणाघात केला आहे. त्यांनी, रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीची धाड पडल्याची बातमी समजली.

पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच "घरभेदी" सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT