Mahanand Dairy Agrowon
ॲग्रो विशेष

Mahanand Dairy : कांदा निर्यात बंदी आणि महानंदवरून रोहित पवार यांची सरकारवर टीकेची झोड

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कांदा निर्यात बंदी आणि महानंद दूध डेअरीवरून आज गुरूवार (२२ रोजी) शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फक्त गुजरातच्या कांदा व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून ही कांदा निर्यात बंदी हटविल्याचा गाजावाजा केला गेला. तर महानंदच्या जमीनीवर राजकारण्यांची नजर असून आपले सरकार गप्प असल्याची टीका केली आहे. रोहित पवार यांनी ही टीका पुण्यातील मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर केली.

सरकारवर जोरदार हल्लाबोल

रोहित पवारांनी कांदा निर्यात बंदीवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना, आधी केंद्राने कांद्याची निर्यात थांबवली. मात्र यावर शिंदे सरकारमधील किंवा भाजप मधील कोणीच आवाज उठवला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शांत होते. यांनी कांदा निर्यात बंदी उठवावी म्हणून पाठपुरवा केला नाही, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे.

निर्यात बंदीची अधिसुचनाच निघाली नाही

तसेच मागिल महिन्यात कांदा बंदी उठेल असे वावटळ उठवले गेले. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात नेला आणि मातीमोल भावाने तो व्यापाऱ्यांकडे दिला. तर आता जेव्हा शेतकरी निर्यात बंदी उठवल्याच्या बातम्यानंतर कांदा घेऊन गेले तर व्यापारी म्हणतात की निर्यात बंदीची अधिसुचनाच निघाली नाही.

फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा

दरम्यान अशी अफका का पसरवली गेली असावी? याबाबत येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यावर खरे कारण समोर आल्याचे रोहित पवार म्हणाले. कांदा निर्यात बंदी ही ३१ मार्चपर्यंत असून त्यात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. तर गुजरातमधील शेतकऱ्यांचा कांदा हा मार्चमध्ये निघतो. त्याची आवक या महिन्यात होते. म्हणून फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंदी उठवल्याची बतावणी करण्यात आल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

असा संशय येतोय...

या पुढे रोहित पवार म्हणाले की, याच्याआधी अनेक सरकारे आली आणि गेली पण महानंद कोणालाच चालवणे जमले नाही. यासाठी कोणत्याच सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. पण आता गुजरातच्या एका संस्थेला महानंद देण्यात येणार आहे. याच्याआधी गुजरातला आयटी सेंटर, आयएफसी सेंटर, हिरे व्यापार सेंटर महाराष्ट्राने गिफ्ट केले. यामुळेच महानंदच्या शेकडो एकर जमिनीवर राजकारण्यांचा डोळा आहे की काय? गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात महानंदची जमीन घालण्याचा घाट राजकर्ते करत आहेत की काय असा संशय येत असल्याचेही रोहित पवार म्हणाले.

या नेत्यांना काहीही पडलेलं नाही

वरळीमध्येही महानंदची मोठी मालमत्ता आहे. जी गुजरातला गिफ्ट केली जात आहे. महाराष्ट्राची अस्मिता पायाखाली तुडवली जात असताना मुख्यमंत्री शिंदे शांत बसले आहेत. शिंदे यांच्यासह कोणत्याच नेत्यांना काहीही पडलेलं नाही, असे रोहित पवार म्हणालेत. तर आपल्या राज्यातील राज्यकर्त्यांचे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राचं लक्ष आहे. त्यांच्या बंगल्यावर मागील पाच वर्षात नुतनीकरणासाठी तब्बल ३० कोटी रूपयांचा चुराडा करण्यात आला आहे. हा सर्वसामान्यांचा पैशाचा चुराडा आहे, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT