Mahananda Dairy : अदानींच्या घशात 'महानंद'ची ५० कोटींची जमीन घालण्याचा राज्य सरकारचा घाट : राऊत पुन्हा कडाडले

Sanjay Raut on Mahanand Dairy : 'महानंदा'वरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी 'महानंदा'वरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
Mahanand Dairy
Mahanand DairyAgrowon

Pune News : 'महानंदा'वरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा पुन्हा आक्रमकपणा समोर आला. त्यांनी आज गुरूवार (२२ रोजी) पत्रकार परिषद घेत यावरून राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. तसेच राज्य सरकारकडून महानंदा डेअरीची गोरेगाव येथील मोक्याच्या जागेवरील ५० कोटींची जमीन विकण्याचा घाट घातला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील महानंद दुग्धसंस्थेचा कारभार आता गुजरातमधून चालवला जाणार आहे. महानंदाचे चेअरमन हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेव्हणे होते, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.

Mahanand Dairy
Dairy Business : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय क्षेत्रात अनेक संधी

तसेच हे शिंदे सरकार राज्यातील एक डेअरी सरळ चालवू शकत नाही. पण याच सरकारमधील शुगर लॉबीतील लोकांच्या डेअऱ्या मात्र व्यवस्थित सुरू असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, महानंदा डेअरीची गोरेगाव येथील मोक्याच्या जागेवरील ५० कोटीची जमीन विकण्याचा घाट राज्य सरकारकडून घातला जात आहे. महानंदा डेअरीची हीच जमीन अदानींना देण्याचा डाव राज्यातील राज्यकर्ते करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मुंबईचा सौदा करायला निघालेत. मात्र याला राज्यातील लोकांचा विरोध दिसत नाही. जी गुजरातमध्ये जाणार आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Mahanand Dairy
Dairy Industry : दुग्ध व्यवसायामुळे बसली संसाराची आर्थिक घडी

याच्याआधी देखील राऊत यांनी ‘महानंदा’वरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानी ४ जानेवारीला महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून पगार दिला नसल्याची टीका केली होती.

तसेच महानंदाच्या २७ एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर सरकारने परजणे कोण आहेत? ते मंत्रिमंडळातील कोणाचे मेहुणे, साडू, आहेत हे स्पष्ट करावे असे आवाहन केले होते. तसेच महानंदवरून जे सगळे आता सुरू आहे त्यावर शिवसेनेचे लक्ष असल्याचेही राऊत म्हणाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com