Shaktipeeth Highway Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ विरोधासाठी मोहोळमध्ये ‘रास्ता रोको’

Mohol Farmers: शेतकऱ्यांची मागणी नसतानाही लादलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी (ता. १) ‘मोहोळ तालुका शक्तिपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती’च्या वतीने मोहोळ येथील शिवाजी चौकात रास्तारोको करण्यात आला.

Team Agrowon

Solapur News: शेतकऱ्यांची मागणी नसतानाही लादलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी (ता. १) ‘मोहोळ तालुका शक्तिपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती’च्या वतीने मोहोळ येथील शिवाजी चौकात रास्तारोको करण्यात आला.

या वेळी संघर्ष समितीचे सदस्य सत्यवान देशमुख म्हणाले, की या शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, शेतकऱ्यांनी हरकतीच्या वेळी ही बाब स्पष्ट केली आहे. तसे लेखी ही दिले आहे. तरीही महसूल प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजणी प्रक्रिया राबविली जात आहे.

या महामार्गामुळे बागायत जमिनी मोठ्या प्रमाणात बाधित होणार असून शेतकऱ्यांना विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. हा महामार्ग उंचावरून जात असल्याने गावाला व शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही उलट जमिनीचे दोन भाग होऊन ती कसणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा.

या वेळी संघर्ष समितीचे सदस्य शाहू देशमुख म्हणाले, शक्तिपीठला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यामुळे या महामार्गाची गरज नाही. विधानसभा निवडणुकी अगोदर प्रशासनाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करू, असे आश्वासन दिले होते.

मात्र निवडणुका संपताच पुन्हा शक्तिपीठाचा घाट घातला आहे. या वेळी अॅड. श्रीरंग लाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी शक्तिपीठ बाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे दिनेश घागरे, ब्रह्मदेव भोसले, नागनाथ गायकवाड, अमर देशमुख, राजेंद्र देशमुख, संजय साठे, अरुण गायकवाड, अण्णा काळे, प्रथमेश गायकवाड, गणेश काळे आदींसह अन्य शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT