Road Show Agrowon
ॲग्रो विशेष

National Food Nutrition Mission : राष्ट्रीय अन्न पोषण अभियान अंतर्गत औंढा येथे ‘रोड शो’

Gajanan Pawar : आहारामधील तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता याची लोकचळवळ उभी राहिली पाहिजे. त्यासाठी औंढा नागनाथ तालुका कृषी विभाग पुढाकार घेणार आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी गजानन पवार यांनी केले.

Team Agrowon

Hingoli News : संतुलित आहारासाठी तृणधान्याचे आहारातील महत्त्व व फायदे मोठे आहेत. सर्वसामान्यांना आहारामधील तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता याची लोकचळवळ उभी राहिली पाहिजे. त्यासाठी औंढा नागनाथ तालुका कृषी विभाग पुढाकार घेणार आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी गजानन पवार यांनी केले.

राष्ट्रीय अन्न आणि पोषण अभियान व पौष्टिक तृणधान्य २०२३-२४ अंतर्गत रोड शोचे शुक्रवारी (ता. १६) आयोजन करण्यात आले होते. या रोड शो ला तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, मुख्याध्यापक भगवान सानप यांनी रोड शोला हिरवी झेंडी दाखवली.

त्यानंतर हा रोडशो नागनाथ विद्यालय या ठिकाणाहून शहरातील प्रमुख मार्गाने रोडशो काढण्यात आला. या रोड शो मध्ये नागनाथ विद्यालयामधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होते.

राष्ट्रीय अन्न आणि पोषण अभियान व पौष्टिक तृणधान्य यांचे फलक हातात घेऊन विद्यार्थी रोडशो मध्ये सहभागी झाले होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, नागनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान सानप, उपमुख्याध्यापक संजय पोले, सरोजनी देवकते,

शंकर सिरसाट, पंढरी प्रधान यांच्यासह कृषी विभागाचे जी. के. काळे, मंडळ कृषी अधिकारी, करण पवार कृषी पर्यवेक्षक, राहुल दराडे, गोविंद भोजे, गजानन लोसरवार, कृषी सहायक राजेश भिसे, प्रकाश राऊत, प्रेमानंद लोणकर, उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management: बंधाऱ्यांतील पाण्याने बहरणार उन्हाळी पिके

Forest Protection: सातपुड्यात डिंकासाठी वणवे पेटविण्याचे प्रकार

CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी कासव गतीने

Lumpy Skin Disease: संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ५४५ पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा

Agriculture University: शिर्के प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीकडे कृषिशास्त्रज्ञांचे लक्ष

SCROLL FOR NEXT