Washim News : ई- पीक पाहणी मोहिमेत रिसोड तालुका अमरावती विभागातून सर्वप्रथम ठरला आहे. तालुक्यात एकूण ५८,११२ शेतकरी असून ५१६२३ शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले.
रिसोड तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ५१६२३ शेतकऱ्यांनी मोबाइल ॲपद्वारे व तलाठी स्तरावरून पीक पाहणी केली. तालुक्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ७४ हजार ७८२ हेक्टर आहे. सर्वसाधारण पेरणी क्षेत्र संपूर्ण ई-पीक पाहणी झाली आहे.
राज्यात ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकरी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून ही पीक पाहणी करीत आहेत.
तहसीलदार तेजनकर यांनी ई-पीक पाहणीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून वेळोवेळी झालेल्या कामाचा आढावा घेतला. पीकविमा, पीक कर्ज व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणीद्वारे सात-बारावर पीक पेरा नोंद असणे आवश्यक आहे.
याबाबत महसूल विभागाच्या वतीने गाव पातळीवर जनजागृती केल्यामुळे शेतकरी ही सजग झाले असून सर्वांच्या सहकार्याने ई-पीक पाहणीत रिसोड तालुका अमरावती विभागातून अव्वल स्थानी ठरला आहे.
सुरुवातीपासूनच ई-पीक पाहणीबाबत जनजागृती करण्यात आली. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याबाबत वेळोवेळी झालेल्या कामाचा आढावा घेतला. सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्ट पूर्ण केले.- प्रतीक्षा तेजनकर, तहसीलदार, रिसोड जि. वाशीम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.