Kolhapur Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Storage Kolhapur : कोल्हापुरात धरणांच्या पाण्यात वाढ सुरूच

Kolhapur Rain Update : नद्यांच्या पाणीपातळीत दहा फुटांनी वाढ झाली. राजाराम बंधाऱ्यासह १७ बंधारे पाण्याखाली गेले.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्‍ह्यात सातत्यपूर्ण पावसामुळे नद्यांच्या पाण्यात वाढ होतच आहे. नदीकाठावरील शेती पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान सोमवारच्या तुलनेत मंगळवार (ता. १७) दुपारपर्यंत अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होता.

यामुळे काहीसा दिलासा मिळाला. नद्यांच्या पाणीपातळीत दहा फुटांनी वाढ झाली. राजाराम बंधाऱ्यासह १७ बंधारे पाण्याखाली गेले. राधानगरी धरणासह तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी, धामणी धरणातून विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत राधानगरी धरणाक्षेत्रण क्षेत्रावर १७२ मिलिमीटर पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली असून, पाण्याची आवक वाढल्याने सेवाद्वार उघडण्याची वेळ आली आहे. पायथा वीजगृहातून पंधराशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

यामध्ये सेवा द्वारातून आणखी एक हजार क्यूसेक विसर्गाची भर पडली आहे. पाऊस असाच राहिल्यास यंदा लवकरच हे धरण भरण्याची स्थिती आहे. काळम्मावाडी आणि तुळशी धरण क्षेत्रात अतिवृष्टी नोंद झाली आहे.

मंगळवारी सकाळपासून धरणक्षेत्र वगळता अन्य तालुक्यात पाऊस थांबल्‍याचे चित्र होते. अनेक ठिकाणी थांबून थांबून काही कालावधीसाठी हलका ते मध्यम पाऊस व परत ऊन सावलीचा खेळ असे चित्र होते. नद्यांचे पाणी वाढत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी नदी काठावरील कृषिपंप काढण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement: आधारभूत किंमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको

Soybean Procurement: ग्रेडरांच्या विळख्यात सोयाबीन खरेदी

Onion MSP: कांद्याला हमीभावाचे संरक्षण मिळणार का? 

Solar Pump Scheme: माजलगावात अल्पभूधारकांना मिळेना सौर कृषिपंप योजना

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे ६ हजार रुपयांवरून १२ हजार होणार का? संसदेत सरकारनं दिली माहिती

SCROLL FOR NEXT