Paddy procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : मुळशीत लक्ष्मीपूजनाला होणार भात खरेदीला प्रारंभ ; जिल्हा बँकेचा पुढाकार

Paddy Crop : मुळशी तालुक्यातील प्राथमिक शेती विकास सोसायट्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला इंद्रायणी भात खरेदी करणार आह.

Team Agrowon

Pune News : कोळवण, ता. मुळशी येथील भैरवनाथ मंदिरामध्ये जिल्हा बँकेकडून परिसरातील सात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या आयोजित केलेल्या भात खरेदीच्या आढावा बैठकीत विविध पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा बँक मुळशी तालुक्यात या हंगामापासून ‘मुळशी ॲग्रो’ या प्रसिद्ध भाताच्या वाणाची शेतकऱ्यांकडून २४ रुपये प्रती किलो दराने खरेदीचा निर्णय आढावा बैठकीत झाला.

या वेळी बँकेचे अधिकारी सुरेश नागरे यांनी भात खरेदीची प्रक्रिया समजावून सांगितली. बँके‌चे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी भात खरेदी योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन केले शेतकर्याकडून खरेदी केलेला भात बँक ‘मुळशी अग्रो’ या नावाने बाजारात विकणार प्रत्येक गावातील केंद्रावर शेतकऱ्याकडून भात खरेदी करण्याची जबाबदारी संबंधित सोसायटीचे संचालकांवर व सचिवांवर देणार आहे.

भाताची गुणवत्ता तपासणीसाठी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक होणार. शेतकऱ्याच्या भाताचे वजन झाले की त्याच जागेवर शेतकऱ्याला ठरल्याप्रमाणे भाताच्या वजनानुसार झालेल्या रकमेचा धनादेश लगेचच दिला जाईल.

लक्ष्मीपूजनाला (ता. १२) पासून भात खरेदी सुरू होणार आहे. भाताच्या पोत्यावर सोसायटी व शेतकऱ्यांचे नाव लिहिणार, भात भरडताना सचिव मिलमध्ये उपस्थित राहणार. बँकेने दिलेल्या दरापेक्षा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला जास्त दर दिला तर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यास भात घातले तरी चालेल. शेवटी आपला उद्देश हा आहे की शेतकऱ्यास जास्तीचे पैसे मिळावेत. बँकेच्या प्रत्येक शाखेत तांदूळ विक्रीस ठेवणार, असे सुनील चांदेरे यांनी सांगितले.

यशवंत गायकवाड म्हणाले, ‘‘बँकेने भात खरेदी सुरू केल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबणार आहे. भाताचे पैसे लगेचच मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले. या वेळेस बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पोपट भाऊ दूडे, भगवान नाकती, भरत सातपुते, धनंजय टेमघरे, बँकेचे अधिकारी बाबासाहेब ववले, राजेंद्र मारणे, सुरेश नागरे, माणिक भालेराव, अध्यक्ष सोपान निबुदे, प्रकाश फाले, गुलाब ओव्हाळ, राम साठे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT