Paddy Bonus Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Bonus : ‘शेतकऱ्यांना तातडीने बोनस अदा करा’

Paddy Farming : पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी केलेली आहे. आता जून उजाडला तरी सरकारने जाहीर केलेला बोनस अजूनपर्यंत जमा करण्यात आलेला नाही.

Team Agrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी केलेली आहे. आता जून उजाडला तरी सरकारने जाहीर केलेला बोनस अजूनपर्यंत जमा करण्यात आलेला नाही.

हा बोनस तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अन्यथा काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकारने बोनस देण्याचे धोरण आहे; परंतु ही बोनसची रक्कम आजतागायत शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली नाही.

त्यामुळे एेन हंगामात शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या वेळी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, किसान तालुका अध्यक्ष जयंत पाटील, वाडा तालुका उपाध्यक्ष गिरीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित चौधरी उपस्थित होते.

काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

सध्या शेतीचा हंगाम सुरू असून, भातपेरणीची कामे सुरू झाली आहेत; मात्र शेतकऱ्यांकडे शेतीसाठी पुरेसे पैसे नसल्याने पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भातशेती लागवडीखाली येणार नाही व मजुरांच्या हाताला काम मिळणार नाही.

त्यामुळे संबंधित मंडळाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भातविक्रीपोटी बोनस रक्कम देण्यात यावी. त्या कामी प्रशासनाकडून संबंधित महामंडळाला योग्य दिशा निर्देश देण्यात यावेत; अन्यथा काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा प्रफुल्ल पाटील यांनी निवेदनातून दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Committee Extension: मुदतीनंतरही पुन्हा मुदतवाढ

Goat Health: शेळ्यांतील देवी लशीत राज्य स्वयंपूर्णतेकडे

Ghod River Water Scarcity: घोड नदी आटण्याच्या उंबरठ्यावर

Mango Fruit Drop Issue: तापमानवाढीमुळे आंबा फळगळ वाढली

Wildlife Census: बुद्धपौर्णिमेला वन्यप्राण्यांची प्रगणना

SCROLL FOR NEXT