Central Drought Assistance: राज्यातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीचे वितरण पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाच्या सादरीकरणानंतर राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीच्या मागणीचा अंतिम प्रस्तावही पुढील आठवड्यात पाठविणार आहे..राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १८ हजार कोटी रुपयांचा प्राथमिक प्रस्ताव पाठविला होता. मात्र कृषी, पाणीपुरवठा, शालेय व उच्च शिक्षण, पशुसंवर्धन, मृदा व जलसंधारण आणि दुष्काळाशी संबंधित इतर विभागांची एकत्रित मागणी ३५ हजार कोटी रुपयांची असल्याने त्यानुसार प्रस्ताव अंतिम करण्यात येत आहे..Drought Assessment: दुष्काळाचे पंचनामे ८० टक्क्यांवर !.दरम्यान, दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामेही पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर प्रस्तावाला अंतिम रूप देण्यात येणार आहे..राज्यात अवर्षणामुळे ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, तेथील पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत. या पंचनाम्यांवर आधारित केंद्र सरकारकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंगल एक महिन्याच्या रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे..दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, यासाठी साडेसात ते आठ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य आपत्ती निवारण प्राधिकरण आणि राज्य सरकारच्या स्वनिधीतून ही रक्कम देण्याच्या हालचाली सुरू असून, याबाबतची फाइल मुख्य सचिव कार्यालयातून वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २७) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मदतीचे वितरण सुरू होणार आहे..Drought Relief Demand: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत द्या : संभाजी ब्रिगेडने.प्रस्ताव अंतिम टप्प्यात, दर जुनेचकेंद्र सरकारकडून एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदत दिली जाणार असून, त्यासाठी नव्याने दर जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप केंद्र सरकारने हे दर निश्चित करून राज्य सरकारला पाठविलेले नाहीत. त्यामुळे जुन्या दरांप्रमाणे प्रस्ताव तयार केला जात आहे. पिकांचे नुकसान, पाणीपुरवठा, जनावरांचा चारा आणि अन्य बाबींसाठी प्राथमिक १८ हजार कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने यात मोठी वाढ होणार आहे. सद्यःस्थितीत जवळपास ३५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे..९० टक्के पंचनामे पूर्ण३०४ तालुक्यांतील ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत ९९ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यापाठोपाठ नाशिकमध्ये ९० टक्के, पुण्यात ९२ टक्के, कोल्हापूरमध्ये ५३ टक्के, लातूरमध्ये ९७ टक्के आणि नागपूरमध्ये ७८ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोकण विभागात केवळ १२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ८४ टक्के शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे..जुनी केवायसी ग्राह्यदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असेल, तर त्या शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत दिली जाणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नाही, त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घ्यावी लागणार होती. मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर लाभ घेतला आहे, त्यांना पुन्हा केवायसीच्या आधारे मदत मिळणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदा पाटील यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.