Handloom Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Traditional Textile Industry : पारंपरिक वस्त्रोद्योगातील हातमाग विणकरांसाठी बक्षीस योजना

Handloom Industry : शासन निर्णयात राज्यातील पारंपरिक वस्त्रोद्योग विणरांचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी, पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांना ही बक्षीस योजना देण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी राज्य शासनाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग, धोरण २०२३-२८ आखले असे असून, सन २०२३-२४ करिता या ‘‘पारंपारीक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना’’ अंतर्गत विणकरांना बक्षिस देण्यात येणार आहे.

या योजनेतर्गंत विजेत्या स्पर्धकांचे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार करण्यात येणार आहेत. शासन निर्णयात राज्यातील पारंपरिक वस्त्रोद्योग विणरांचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक या क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी, पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांना ही बक्षीस योजना देण्यात येत आहे.

सदर योजनेअंतर्गत पाच पारंपारिक पैठणी साडी, हिमरु शाल, करवत काटी साडी, घोंगडी, खण फॅब्रिक ह्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट डिझाईन्सचा राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार करण्यात येणार असून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. सदर बक्षिसाची रक्कम पारंपरिक वस्रोद्योग विणकरांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार आहे.

१९ जुलैपर्यंत मुदत

पारंपरिक वस्त्राचे विणकाम करणारे सर्व विणकर, खाजगी/सहकारी संस्था/ महामंडळ/ महासंघाचे/ स्वयंसेवी संस्था /गट या स्पर्धेत भाग घेवू शकतील. अर्जासोबत विणकाम करतानाचा विणकराचा जिओ टॅगींग फोटो सादर करणे गरजेचे राहील आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

हातमाग विणकरांना त्यांचेकडील उत्कृष्ट वाण उपआयुक्त वस्त्रोद्योग, सोलापूर कार्यालय- पत्ता- महसूल कर्मचारी सहकारी संस्था इमारत, जुने जिल्हाधिकारी, सोलापूर आवार, सोलापूर येथे शुक्रवार (ता. १९) पर्यंत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त चंद्रकांत टिकुळे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT