Radhakrishna Vikhe Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Radhakrishna Vikhe Patil : शिर्डीत कृषी मालाचे विक्री केंद्र सुरू करू; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही

Shiwar Feri and Agricultural Exhibition : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.  

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून तरुणांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त आयोजन शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत  होते. हे शिवार फेरी व कृषी प्रदर्शन प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विखे यांनी शिर्डीत कृषी मालाचे विक्री केंद्र सुरू करू अशी ग्वाही देताना, शिवार फेरी, कृषी प्रदर्शनसारख्या उपक्रमातून कृषी संशोधनास चालना मिळेल असा दावा  विखेंनी केला आहे. 

याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार संचालक डॉ. जी. के. ससाणे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे पाटील आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, जैविक तंत्रज्ञानाच्या आधारावर पिकविलेला भाजीपाला भाविकांसह सर्वसामान्यांना  उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डीत कृषी मालाचे विक्री केंद्र सुरू केले जाईल. तर यासाठी जागा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही विखे यांनी यावेळी दिली. तसेच शेतीत जैविक खतांचा वापरावरून शेतकरी जागृत झाला असून कृषित महिलांचा सहभाग वाढला आहे. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी आदर्श असले पाहिजे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम या संस्थांनी करावे असे आवाहन विखे यांनी याप्रसंगी केले. 

शेती उत्पादनाबरोबर कृषी आणि पणन विभागाच्या बळकटीसाठी कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि समूह शेतीचा प्रयोग झाला पाहिजे. आपला शेतकरी प्रयोगशील असून त्याला संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मागील काही वर्षांत केंद्र सरकारने शेती क्षेत्रात १ लाख कोटींची गुंतवणूक केली असून आता शेती पारंपरिक राहिलेली नाही. आजची शेती आधुनिक तंत्रज्ञानाची आहे. फवारणीसाठी ड्रोनच्या वापरासह कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील कृषी क्षेत्रात वापर वाढत आहे. त्यामुळे दूधाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत जाईल असेही विखे यांनी म्हटलं आहे. तसेच सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल उच्च शिक्षणाकडे वाढत आहे. त्यामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विषयक उपक्रम व योजनांची माहिती देणाऱ्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर बँकाँक येथे कृषी तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण घेतलेल्या ३० विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवरा कृषी शास्त्र संस्था, प्रवरा कृषी महाविद्यालय, प्रवरा जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (खडकेवाके), कृषी तंत्रनिकेतन (लोणी), पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह परिसरातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT