Chana Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Procurement : काही जिल्ह्यांत हरभरा खरेदीवरील निर्बंध उठविले

Chana News : तीन दिवस शिल्लक; शेतकऱ्यांच्या फायद्याविषयी साशंकता

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Chana MSP : अकोला ः किमान आधारभूत किमतीने (MSP) या हंगामात सुरु असलेल्या हरभरा खरेदीला आता केवळ तीन दिवस शिल्लक आहेत.

त्यात आता राज्यातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ या काही प्रमुख हरभरा उत्पादक (Chana Producer) जिल्ह्यांतील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निर्बंध मुक्त केले आहे. या नवीन आदेशामुळे खरेदी प्रक्रियेला किती प्रमाणात फायदा होईल, याबाबत साशंकता आहे.

संबंधित जिल्ह्यांना दिलेली उद्दिष्ट मर्यादा उठवण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या तथापि एसएमएस न दिलेल्या शेतकऱ्यांना आवश्‍यकतेनुसार संदेश द्यावेत व उर्वरित हरभरा खरेदी केली जावा, असे निर्देश या सुधारित आदेशाद्वारे देण्यात आले आहेत.

यंदाच्या रब्बीमध्ये उत्पादित झालेला राज्यातील हरभरा १४ मार्चपासून ५३३५ रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदीला सुरुवात करण्यात आली. यंदा प्रत्येक जिल्ह्याला उत्पादकतेवर आधारित उद्दिष्ट देण्यात आले. याचा फटका सुरुवातीच्या टप्‍प्यात बसला.

खरेदी उद्दिष्ट अवघ्या काही दिवसातच पूर्ण झाले. परिणामी सुधारित उदिष्टाच्या प्रतीक्षेत अनेक दिवस खरेदी प्रक्रिया ठप्प होती. आतापर्यंत हरभरा खरेदीचे दोनदा उद्दिष्ट वाढवून देण्यातही आले. परंतु हे धोरण हरभरा उत्पादकांच्या मुळावर उठले.

नवीन उद्दिष्ट नेमून देईपर्यंत आणि सुधारित आदेश यंत्रणांपर्यंत जाईपर्यंत बराच वेळ गेला. खरेदी प्रक्रिया या कारणाने तसेच बारदान्यामुळेही बंद राहिली. शिवाय शासकीय सुटीच्या दिवशी खरेदीला सुटी दिल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

हजारो शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झालेला नाही. हंगाम तोंडावर दिसत आहे. तसेच संपूर्ण हरभरा खरेदी केला जाण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी कमी दराने बाजार समित्यांमध्ये हरभरा विकल्याची स्‍थिती आहे.

उशिरा निघाले आदेश
यंदाच्या हरभरा खरेदीला सुरुवातीपासून गोंधळाचा फटका बसला. उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी बराच वेळ गेला. शेतकऱ्यांना एसएमएस दिलेले असूनही तेव्हा खरेदी बंद राहिल्याने मोजणी होऊ शकली नाही.

आता ११ जूनपर्यंत राज्यात हरभरा खरेदीची मर्यादा आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल केल्याचा फायदा किती प्रमाणात होईल, याबाबत साशंकता आहे. हाच निर्णय सुरवातीपासून असता तर खरेदी आकड्यात निश्‍चितच वाढ झाली असती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT