Harbhara Market
Harbhara MarketAgrowon

Chana Procurement : हमीभावाने ६५ लाख क्विंटल हरभरा खरेदी

Chana Rate : राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सुमारे ६५ लाख ५० हजार क्विंटल हरभऱ्याची आतापर्यंत खरेदी पूर्ण झाली आहे.
Published on

Akola News : राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सुमारे ६५ लाख ५० हजार क्विंटल हरभऱ्याची आतापर्यंत खरेदी पूर्ण झाली आहे. अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू असून, यंदा राज्याला ८१ लाख क्विंटल खरेदीचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे.

बाजारपेठांमध्ये हरभरा अवघा ३९०० ते ४७०० रुपयांदरम्यान विक्री होत आहे. यामुळे शासनाच्या हमीभाव (५३३५ रुपये) व बाजारातील खरेदी किमतीत मोठा फरक पडलेला आहे. शेतकऱ्याला क्विंटलमागे मोठे नुकसान होत असल्याने शासकीय खरेदीला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला.

आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी सुमारे ६१३ केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, मार्कफेड, महाएफपीसी, पृथाशक्ती एफपीसी, वॅपको, महाकिसान व्ही, महाकिसान संघ, महास्वराज्य अशा विविध संस्थांमार्फत स्थानिक खरेदीदारांकडून हरभऱ्याची खरेदी करून घेतली जात आहे. या खरेदीसाठी राज्यात सहाशेपेक्षा अधिक केंद्र कार्यान्वित झालेले आहेत.

Harbhara Market
Chana market: हरभऱ्याचा बाजार दबावातच का आहे?

राज्यात या रब्बी हंगामात सुमारे ३० लाख हेक्टरपर्यंत पेरणी पोहोचली होती. सरासरीच्या १३५ टक्के यंदा पेरणी झाली होती. हरभऱ्याचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात चांगले राहिले. पीक उत्पादकता बऱ्यापैकी आल्याने साहजिकच हा शेतीमाल विक्रीचा दबाव बाजारपेठांवर होता.

Harbhara Market
Chana Procurement : ३३ हजार शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी

हरभरा काढणी सुरू झाल्यानंतर बाजारात दर चार हजारांपासून सुरू झाला. केंद्राने या हंगामासाठी नाफेडला ८१ लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिलेले असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी सुमारे ६१ लाख ५० हजार क्विंटल हरभरा आतापर्यंत खरेदी झाला आहे.

मध्यंतरी सात ते आठ जिल्ह्यांत उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी प्रक्रिया बंद पडली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर त्या जिल्ह्यांचे उद्दिष्ट वाढवून पुन्हा तेथे खरेदी सुरू झालेली आहे. राज्यात लवकरच निर्धारित लक्ष्यांक पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संस्थानिहाय सुरू असलेले केंद्र व खरेदी

संस्था---केंद्र

व्हीसीएमएफ---५१

मार्कफेड---२१५

महाएफपीसी---१४७

पृथाशक्ती---७१

वॅपको---६२

महाकिसान व्ही---२०

महाकिसान संघ---२२

महास्वराज्य---२२

एकूण---६१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com