Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Insurance : कपाशीच्या विमा तक्रारी निकाली काढा

Crop Insurance Compensation : पावसामुळे कापूस खराब झाला. अशा परिस्थितीत विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

Team Agrowon

Akola News : गेल्या महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा कपाशीचे उत्पादन घटले त्यातही हाती आलेला कापूस घरी येईल अशी आशा होती. परंतु पावसामुळे कापूस खराब झाला. अशा परिस्थितीत विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

तक्रारींची दखल कंपनीने घेतलेली नाही. कपाशी पिकाचे सर्वेक्षण केले नाही. तरी पीकविमा कंपनीकडे दाखल कपाशी पिकाच्या तक्रारी तत्काळ निकाली काढाव्यात, अशी मागणी डॉ. पुरुषोत्तम दातकर व शेतकऱ्यांनी अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या बाबत त्यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले, की कंपनीकडे तक्रारी दाखल करताना अनावधानाने इंग्रजी भाषेचे अॅप असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेता कपाशीच्या शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. एचडीएफसी इरगो कंपनीने हा अन्याय शेतकऱ्यांसोबत केला आहे. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने मोठा प्रीमीयम कंपनीने घेऊन सुद्धा सर्वेक्षण करण्यास तयार नाही.

यासाठी लवकरात लवकर कंपनीला सदर तक्रारी दुरुस्त करून कपाशीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून घेण्यासाठी प्रशासनाने आदेश द्यावा, अन्यथा सदर कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.

गेल्या महिन्यात पावसामुळे खरिपासह रब्बीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीला फोनद्वारे, मेलद्वारे आपल्या शेतातील नुकसानाची माहिती दिली.

त्यातील काही शेतकऱ्यांचे पीकविमा कंपनीद्वारे सर्वेक्षण सुद्धा झाले. बऱ्याच शेतकऱ्यांचे सर्वेक्षण अजूनपर्यंत झालेले नाही. त्यातील ऑनलाइन तक्रारींचे सर्वेक्षण करण्यात यावे असे शेतकऱ्यांनी म्हटले.

पूर्णा खोरे पाणीपट्टा विकास संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दातकर यांच्या नेतृत्वात निवेदन देताना बोर्डी गावचे उपसरपंच राजेश भालतिलक, सुरेश पाटील, विजय बघेल, हरीभाऊ वाघोडे, अनिल फैसीड, शिवदर्शन हागे, रामेश्‍वर वहिले, दीपक खंडारे, शिरीष महल्ले, बंटी पांडे, भाष्कर कोळसकर, नागेश भगत, गजानन रहाने, सुनील राठोड, वैभव आतकड, शुभम महाले, सुनील बोंद्रे, शालिग्राम नेवारे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT