Crop Insurance : पीकविमा कंपनीला आठ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

Crop Insurance Company : पुरेशा पावसाअभावी करपलेल्या खरीप हंगामातील पिकांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के मदतीचे आदेश देऊनही मदतीस टाळाटाळ करीत असलेल्या पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Nashik News : पुरेशा पावसाअभावी करपलेल्या खरीप हंगामातील पिकांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के मदतीचे आदेश देऊनही मदतीस टाळाटाळ करीत असलेल्या पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले.

कापूस उत्पादकांसह उर्वरित पात्र शेतकऱ्यांना तुम्ही आठ दिवसांच्या आत मदत दिली नाही, तर तुमच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल. इतकेच नव्हे, तर पीकविमा कंपनीच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला.

पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात ओरिएन्टल पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात १०५ कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे.

त्यापैकी ५७ कोटी ४६ लाख रुपये वितरित झाले. राज्य सरकारनेही विमा कंपनीला ४०६ कोटी रुपये वर्ग केले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी, मूग, भुईमूग, तूर व भाताचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

यात कापूस उत्पादकांनाही मदत देण्याचे शासनाने आदेश देऊनही पीकविमा कंपन्यांकडून ती दिली जात नसल्याचा मुद्दा चर्चेला आला. यावर पालकमंत्री भुसे चांगलेच संतापले. नियमात बसत असतानाही तुम्ही शेतकऱ्यांना विम्याची मदत का देत नाही? आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात का, असा सवाल त्यांनी विमा अधिकाऱ्यांना केला.

Crop Insurance
Crop Insurance : पिकविम्याच्या अग्रिमसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे

या प्रश्‍नावर पीकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्मितहास्य केले. यावर भुसे अधिकच संतापले; हसून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू नका. तुम्ही काही दान, धर्म करीत नाही आहात. सरकार तुम्हाला निधी देते.

जर हे काम आम्हालाच करायचे आहे, तर तुमची गरजच काय? आठ दिवसांत यावर योग्य कार्यवाही करा. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी बोलायचे, काय करायचे ते करा; पण जर आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर विमा कंपन्यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक देईन, असा इशाराच या वेळी पालकमंत्री भुसे यांनी दिला.

विमा कंपन्यांचे अधिकारी नियमावर बोट ठेवत असताना पालकमंत्री भुसे चांगलेच भडकले. एखाद्या वर्षी विमा कंपन्यांना नुकसान होते; पण मागची दहा वर्षे तुम्हाला नफा होतो, तेव्हा तुम्ही काय दान करतात का? मग तुमचे मागच्या दहा वर्षांचे रेकॉर्ड काढू का, वैयक्तिक जाऊ नका, मीही वैयक्तिक गेलो तर अडचणीचे ठरेल, असा दमच भुसेंनी विमा कंपन्यांना भरला.

Crop Insurance
Crop Insurance : तांत्रिक अडचणीत शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला, मंत्री दादाजी भुसेंनी घेतला आढावा

नगरचे नको, नाशिकचे आकडे सांगा

बैठकीत अहमदनगर जिल्ह्यात दिल्या जाणाऱ्या मदतीचा उल्लेख एका अधिकाऱ्याने केला. यावर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या पीकविम्याचा अहवाल वाचनास सुरुवात केली. यावर भुसे यांनी मी नाशिकचा पालकमंत्री असून, अहमदनगरची आकडेवारी वाचून काय फायदा असे सांगत नाशिकची आकडेवारी सादर करण्यास सांगितले.

बैठकीतील ठळक मुद्दे

५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांचा पीकविम्यात सहभाग

खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १०५ कोटी रुपये मंजूर

आतापर्यंत ५७ कोटी ४६ लाख रुपयांचे वाटप

कापूस उत्पादकांना मदत दिली जात नसल्याने नाराजी

पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याचे निर्देश

कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार

तांत्रिक अडचणींमुळे अपात्र ठरलेल्या अर्जाची पुनःपडताळणी करण्याचे आदेश

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com