Crop Insurance : परभणीत ३ लाख ८८ हजार हेक्टरवरील पिके विमा संरक्षित

Crop Insurance Proposal Update : गतवर्षी (२०२२-२३) रब्बी हंगामात ४१ हजार ९९० विमा प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातुलनेत यंदा विमा प्रस्तावात ४ लाख ८२ हजार ९९ एवढी वाढ झाली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेतील शेतकरी सहभागात मोठी वाढ झाली आहे. यंदा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५ लाख २४ हजार ८९ विमा प्रस्ताव सादर केले आहेत.

एकूण ३ लाख ८८ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ४३८ कोटी ३४ लाख २९ हजार ११५ रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. गतवर्षी (२०२२-२३) रब्बी हंगामात ४१ हजार ९९० विमा प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातुलनेत यंदा विमा प्रस्तावात ४ लाख ८२ हजार ९९ एवढी वाढ झाली आहे.

रब्बी ज्वारी पीक विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत तर गहू व हरभऱ्याच्या विमा प्रस्तावासाठी शुक्रवार (ता.१५) पर्यंत अंतिम मुदत होती. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे ५ लाख २४ हजार ८९ विमा प्रस्ताव केले आहेत.

त्याद्वारे ३ लाख ८८ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ४३८ कोटी ३४ लाख २९ हजार ११५ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. शेतकरी हिश्‍श्याचा ५ लाख २४ हजार ८५ रुपये, राज्य व केंद्र शासनाच्या हिश्शाचा मिळून एकूण १५८ कोटी ६८ लाख ८२ हजार ५२ रुपये एवढा विमा हप्ता आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पिकविम्याच्या अग्रिमसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे

उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२४ हि अंतिम मुदत आहे. उन्हाळी भुईमुगाचे २ हजार ७५ विमा प्रस्ताव आले असून १ हजार ९७ हेक्टरवरील पिकासाठी ४ कोटी ७१ लाख ४८ हजार १६८ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. गतवर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारी,गहू,हरभरा तसेच उन्हाळी भुईमुगाचे मिळून एकूण ४२ हजार १६४ विमा प्रस्ताव सादर होते.

Crop Insurance
Crop Insurance : रब्बीतील ३ लाख ६४ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच
यंदा रब्बीत प्रथमच पीकविम्यासाठी १ रुपया विमा हप्ता आहे.अवेळी पाऊस,गारपीट आदी नैसर्गिक संकटाची जोखीम लक्षात घेऊन यंदा रब्बी पीक विमा योजनेतील सहभाग वाढल्याचे दिसत आहे.
रवी हरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी

रब्बी २०२३ पीकनिहाय विमा प्रस्ताव स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक विमा प्रस्ताव संरक्षित क्षेत्र विमा संरक्षित रक्कम (कोटीत)

ज्वारी १५२६२३ ९७६५२ ३३२.०१

हरभरा ३२०७३२ २६६४९७ ९९९.३६

गहू ५०७३४ २४३४५ १०२.२४

उन्हाळी भुईमूग २०७५ १०९७ ४.७१

तालुकानिहाय पीकविमा प्रस्ताव स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये )

तालुका विमा प्रस्ताव संख्या विमा

संरक्षित क्षेत्र

परभणी ८४५८२ ७२९४३

जिंतूर ९१२६४ ६६०२४

सेलू ५५२७६ ४०७४५

मानवत ३४१८२ ३११२०

पाथरी ४०२५० ३२४४१

सोनपेठ ३१११४ २६२८०

गंगाखेड ६८४३१ ४१६४७

पालम ५६२०६ ३५२३५

पूर्णा ६३८५९ ४३१५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com