Union Budget 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Union Budget 2024 : शेतकरी, गरीब, युवा आणि महिलांना न्याय देणारा संकल्प : अर्थमंत्री निर्मला सितारामण

Nirmala Sitaraman : शेतकऱ्यांसाठी जास्त उत्पादन देणारी आणि हवामान बदलाला अनुकूल वाणांची निर्मिती आणि महिला विकासासाठी सरकार कटीबध्द असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले.

Anil Jadhao 

Pune News : शेतकरी, युवा, महीला आणि गरीब या घटकांना न्याय देण्यासाठी पुढील वर्षभर सरकार काम करणार आहे. युवकांना रोजगारासह कौशल्य विकास, शेतकऱ्यांसाठी जास्त उत्पादन देणारी आणि हवामान बदलाला अनुकूल वाणांची निर्मिती आणि महिला विकासासाठी सरकार कटीबध्द असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, बजेटमध्ये ४ घटकांवर जोर देण्यात आला. त्यात गरीब, महीला, युवा, शेतकरी यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्वाच्या पिकांसाठी उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा दिला. तर गरिबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला ५ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. याचा फायदा देशातील ८० कोटी जनतेला होत आहे. 

पुढील वर्षभरात सरकार रोजगार, कौशल्य, सुक्ष्म-लहान आणि मध्यम उध्योग तसेच मध्यम वर्गावर जोर देणार आहे. यासाठी पंतप्रधान पॅकेजमधून ५ योजना राबविल्या जाणार आहेत. यातून पुढील ५ वर्षात ४.१ कोटी युवकांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी निर्माण होतील. त्यासाठी २ लाख कोटींची तरतूद करण्यात आली. 

२०२४-२५ साठी शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी १.४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुढील ५ वर्षात २० लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्यांदा ईपीएफओवर नोंदणी झालेल्या आणि १ लाखापेक्षा कमी पगार असलेल्या फाॅर्मल क्षेत्रातील युवकांना १५ हजारांपर्यंत लाभ मिळणार आहे. तीन हप्यात त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. २१० लाख युवकांना फायदा होणार आहे, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.   

विकसित भारताच्या वाटचालीत सर्वांना संधी मिळावी यासाठी सरकार ९ प्राधान्य क्षेत्रे ठरवली आहेत. 
१. उत्पादनवाढ आणि हवामान बदलाला अनुकूल शेती
२. रोजगार आणि कौसल्य
३. सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय
४. निर्मिती आणि सेवा
५. शहरी विकास
६. ऊर्जा सुरक्षा
७. पायाभूत सुविधा
८. इनोव्हेशन, संशोधन आणि विकास
९. पुढच्या टप्प्यातील सुधारणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT