Forest Land Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Land : बनावट दस्ताऐवज करून राखीव वन जमीन हडपली

Team Agrowon

Pune News : शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून, बनावट दस्ताऐवजतून राखीव वन जमीन हडपल्याप्रकरणी जुन्नर बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्यासह पत्नी, मुलगा आणि दस्तनोंदणी अधिकाऱ्यांसह ११ जणांविरोधात जुन्नर वन विभागाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार जुन्नर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी वन विभागाकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून जुन्नरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्राथमिक चौकशीअंती राखीव वनक्षेत्राचे बनावट खरेदीखत झाल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे संबंधिताविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याच्‍या लेखी सूचना उपवनसंरक्षक कार्यालयाने करण्याबाबत कळविले होते. याप्रकरणी केलेल्या चौकशीत कुरण येथील नवीन गट नंबर ४४२ व ४५४ (जुना सर्व्हे नं ९६) तसेच नवीन गट नंबर ४५२(जुना सर्व्हे नं ९५) चे ‘राखीव वन’ दर्जा असलेल्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात बनावट दस्ताच्या आधारे दस्तनोंदणी झाल्याचे तसेच अधिसूचनेमध्ये फेरफार करून, राखीव वन जमीन हस्तांतर व्यवहार झाला असल्याचे आढळून आल्याने ही फिर्याद देण्यात आली आहे.

महसूल विभागाकडून अरुण देशमुख यांना हे राखीव वनक्षेत्र उपजीविकेसाठी शेती प्रयोजनार्थ वाटप झाले होते. या बाबतच्या महसूल विभागाच्या अटी व शर्तींचा भंग झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वन जमिनीच्या बनावट दस्तांच्या आधारे वन विभागाची फसवणूक जुन्नर, कुरण, पिंपळवंडी, वानेवाडी येथील व्यक्ती तसेच तत्कालीन दुय्यम निबंधक व पुराभिलेख संचालनालयातील तत्कालीन कर्मचारी या शासकीय कर्मचाऱ्यांनी केली असल्याचे चव्हाण यांना चौकशीत दिसून आले.

कुरण येथील दोन्ही गट नंबरच्या दस्तनोंदणी गैरव्यवहारप्रकरणी अरुण देशमुख, अलका लेंडे, शुभांगी देशमुख, अनिकेत लेंडे, शकुंतला गणेशकर, रोहन गणेशकर, रघुनाथ लेंडे, तत्कालीन सहायक संचालक, पुराभिलेख संचालनालय, मुंबई येथील अज्ञात व्यक्ती तसेच नारायणगावचे तत्कालीन दुय्यम निबंधक यांच्याविरुद्ध वन विभागाच्या जमिनीचे कटकारस्थान, फसवणूक व बनावट दस्ताच्या आधारे अपहार करून गैरलाभ घेतला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

वन विभागाच्या तक्रारीनुसार रघुनाथ लेंडे आणि इतर १० जणांवर बनावट दस्त आणि शासनाच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- किरण अवचर, पोलिस निरीक्षक, जुन्नर पोलिस ठाणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT