Maratha Reservation Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation Survey : आरक्षण सर्व्हेचे काम पूर्ण

Survey Update : मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची संख्या ६५ हजार ७२५ आणि आरक्षित प्रवर्गातील कुटुंब संख्या सहा लाख १६ हजार ७१९ असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Team Agrowon

Vasai News : मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. सर्वेक्षण करण्याचे निर्देश शासकीय विभागाला दिले आणि सर्व्हे सुरू झाला. वसई-विरार महापालिका परिसरात प्रभागनिहाय सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

यात मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची संख्या ६५ हजार ७२५ आणि आरक्षित प्रवर्गातील कुटुंब संख्या सहा लाख १६ हजार ७१९ असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. वसई-विरार शहरात मोठ्या प्रमाणात मराठा समाज वास्तव्यास आहे. या समाजाकडून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.

त्यामुळे काही वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यभरातील वातावरण बदलले. त्यातच मराठा आरक्षणाबाबत राज्य मागास आयोगाच्या आदेशानुसार, २३ जानेवारीपासून महापालिका प्रशासक अनिलकुमार पवार यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि त्या आधारे घरोघरी सर्व्हे सुरू झाला.

हे काम दोन आठवड्यांत पूर्ण करण्यात आला. आता सर्वेक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात एकूण सहा लाख ८१ हजार कुटुंबीयांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्राची लोकसंख्या जवळपास २५ लाखांच्या घरात आहे.

शहरी आणि ग्रामीण भाग मोडतो. त्यामुळे सर्व्हेसाठी नियोजन प्रशासनाने केले होते आणि एकूण एक हजार ३३८९ प्रगणक नेमण्यात आले होते. प्रगणकांनी घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. मराठा, खुला प्रवर्ग; तसेच आरक्षित प्रवर्ग असा सर्व्हे करत माहिती अचूक भरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सरकारने दिलेल्या आदेशानुसार प्रगणक नेमून मराठा आरक्षणसंदर्भात वसई-विरार शहरातील कुटुंबीयांचा सर्व्हे करण्यात आला. यात मराठा व खुला प्रवर्ग व आरक्षित प्रवर्ग अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
डॉ. किशोर गवस, उपायुक्त, महापालिका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT