Pune News: दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सहा जलयोद्ध्यांना विशेष अतिथी म्हणून जलशक्ती मंत्रालयाकडून निमंत्रित करण्यात आले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रातील अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या सहा जलयोद्ध्यांची दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन कार्यक्रमासाठी निवड केली आहे.
या जलयोद्ध्यांनी अटल भूजल योजनेच्या माध्यमातून लोकसहभागातून गावातील भूजल पातळी उंचावण्यासाठी, भूजल व्यवस्थापनासाठी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. राज्यातून दीपाली लोणकर, काऱ्हाटी (पुणे), सुधार मानकर, जरुडी, ता. वरुड (अमरावती), अमोल काटकर, किरकसाल, ता. माण (सातारा), सुनील गरड, खेड (धाराशिव), छायाताई कोळेकर, नानगोले, ता. कवठे महांकाल (सांगली) आणि शीतल झुंजारे, हरंगुळ (लातूर) या वॉटर वारियर्सना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलन कार्यक्रमाकरिता ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
गावकऱ्यांनी घरगुती व शेतीमध्ये पाण्याचा वापर काळजीपूर्वक व काटकसरीने करावा यासाठी जनजागृती केलेली आहे. स्वत:ची नोकरी, व्यवसाय सांभाळून भूजल संवर्धनासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग नोंदवला आहे. गावातील भूजल व्यवस्थापनासाठी त्यांनी सातत्या... दिलेल्या योगदानामुळे सन २०२२-२३ मधील भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत त्यांच्या ग्रामपंचायतींनी लाखोंचे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. दुष्काळग्रस्त गावांना पाणीदार गावे अशी ओळख मिळवून देण्यात या जलयोद्ध्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या कार्याची दखल घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. चव्हाण यांनी त्यांची निवड केली आहे.
अटल भूजल योजनेच्या माध्यमातून या जलयोद्ध्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने भूजल व्यवस्थापनासाठी रिचार्ज शाफट, सिमेंट नाला बांध, यासारख्या भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना व त्यांची देखभाल दुरुस्ती, पाणी बचतीसाठी सूक्ष्म सिंचन, मल्चींग, शेडनेट पॉलीहाऊसची उभारणी यासारख्या उपाययोजना राबविण्याबाबत ग्रामस्थांना प्रवृत्त केले आहे. जलसाक्षरतेसाठी कार्यशाळा, शेतकरी मेळावे, जल दिंडी यांचे आयोजन करण्यात सहभाग घेतला आहे.
गावामध्ये योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्र, पीझोमीटर, वॉटर लेवल इंडिकेटर, वॉटर फलो मीटर यांसारख्या संयंत्रांच्या वापराबाबत तसेच त्यांच्या नोंदीबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून ग्रामस्थांना पाण्याचा ताळेबंद तसेच गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पीक पद्धतीत बदल करून पाणी बचतीच्या उपाययोजनांचा अवलंब केला आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे वाहून जाणारे पाणी गावाच्या शिवारात थांबवण्यास गावाला यश आले आहे. त्यामुळे भूजल पातळीत पर्यायाने लोकांच्या आर्थिक स्थितीत बदल झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.