KDCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

KDCC Bank : शेती, बिगरशेती संस्थांसाठी सामोपचार परतफेड योजना सुरू

बँकेच्या शेती कर्जे विभागाकडील थकबाकीदार विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा संस्था तसेच इतर संस्थाना या योजनेत सहभाग घेता येणार आहे.

Team Agrowon

Kolhapur District Bank : येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) (KDCC Bank) बँक २०२२ -२३ या आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार शेती व बिगर शेती सहकारी संस्थांसाठी सामोपचार परतफेड योजना सुरू केली आहे.

अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ (MLA Hasan Mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या शेती कर्जे विभागाकडील थकबाकीदार विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा संस्था तसेच इतर संस्थाना या योजनेत सहभाग घेता येणार आहे.

३१ मार्च २०१५ अखेर अनुत्पादित वर्गवारीमध्ये असलेल्या थकबाकीदार संस्थांना या योजनेसाठी पात्र आहेत.

तसेच या योजनेमध्ये ३१ मार्च २०१४ अखेर अनुत्पादित वर्गवारीमध्ये थकबाकीदार असलेल्या सहकारातील नागरी पतसंस्था, नागरी बँका, ग्राहक संस्था, यंत्रमाग संस्था, औद्योगिक संस्था, मार्केटिंग संस्था, प्रक्रिया संस्था, खरेदी-विक्री संघ, तोडणी वाहतूक संस्था, वाहनधारक संस्था, मजूर संस्था, कुक्कुटपालन आदी बिगर शेती संस्था सहभागी होण्यास पात्र आहेत.

या योजनेमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेती संस्थांच्या शेतकरी सभासदांसाठी ८.०५ टक्के व संस्थांसाठी बँक पातळीवर ६.०५ टक्के दराने व्याज आकारणी होणार आहे. त्यातून थकबाकीच्या तारखेपासून आलेला वसूल वजा जाता सामोपचार परतफेडीची रक्कम निश्‍चित केली जाणार आहे.

बिगर शेती संस्थांची थकबाकीच्या तारखेपासून ३१ मार्च २०१४ अखेर ८.०५ टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येणार आहे. या आकारणीमधून आजअखेर आलेला वसूल वजा जाता शिल्लक रक्कम ही सामोपचार परतफेड योजनेची पात्र रक्कम म्हणून निश्‍चित केली जाणार आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २५ मार्च

या योजनेचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या सर्व थकबाकीदार सहकारी संस्थांनी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २५ मार्च २०२३ अखेर आहे.

योजनेत समाविष्ट होत असताना सामोपचारासाठी निश्‍चित केलेल्या रकमेच्या किमान २५ टक्के रक्कम ३१ मार्च २०२३ अखेर भरून बँकेशी करार करणे गरजेचे आहे.

उर्वरित रक्कम ८.०५ टक्के व्याजासह कराराच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत भरायची आहे. अवसायानात गेलेल्या, विनानोंदणी झालेल्या व दावा सुरू असलेल्या संस्थानाही सहभागी होता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT