Ujani Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Canal : फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती अंतिम टप्प्यात

क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. २२ फेब्रुवारीनंतर पुन्हा त्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.

Team Agrowon

Solapur News : उजनीचा डावा कालवा (Canal) पाटकुलजवळ (ता. मोहोळ) फुटल्यानंतर तातडीने धरणातील पाणी बंद करावे लागले होते. आता त्या कालव्याची दुरुस्ती यांत्रिकी विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. २२ फेब्रुवारीनंतर पुन्हा त्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.

सोलापूर, नगर व पुणे (Solapur, pune, Nagar District) जिल्ह्यांसाठी वरदान असलेल्या उजनी धरणामुळे उसाचे क्षेत्र वाढले आणि साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक झाली. मुख्यत्वे डावा व उजवा कालव्यातून शेतीसाठी उजनीचे पाणी सोडले जाते.

सीना-माढा उपसा सिंचन योजना दहिगाव उपसा सिंचन योजना, कॅनॉल अशा पद्धतीने शेतीला उजनीतून पाणीपुरवठा होतो. भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी वर्षातून किमान दोन-तीन वेळा पाणी सोडले जाते.

जिल्ह्यातील जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्राला उजनी धरणातून पाणी मिळते. आणखी काही योजना पूर्ण झाल्यानंतर सिंचनाखालील क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान, पावसाळ्यानंतर शेतीसाठी उजनीतून पहिले आवर्तन सोडले आणि पाण्याच्या दाबामुळे कमकुवत झालेला डावा कालवा पाटकूलजवळ अचानक फुटला.

त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरले आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देत दुसरीकडे पाटबंधारे विभागाने कालव्याची दुरुस्तीदेखील तातडीने हाती घेतली.

त्या कालव्यातून कुरुल, बेगमपूर, कारंबा व मोहोळ शाखेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळते. पाणी बंद झाल्याने त्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली, पण आता पाच-सात दिवसांत काम पूर्ण होणार असून, त्यानंतर तातडीने उजनीतून पाणी सोडले जाणार आहे. मुरुम, माती टाकून त्यावर रोलिंग केले जात आहे.

नुकसानग्रस्तांना लवकरच मदत

फुटलेल्या या कालव्याचे सहा-सात दिवसांत काम पूर्ण होणार असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले असून, कृषी व महसूल विभागाचा अहवाल आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, त्याचेही काम सुरू आहे, असे लाभक्षेत्र प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT