Dhananjay Munde Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Compensation : पीक विमा कंपन्यांकडे भरपाईची २२४ कोटींची थकबाकी ; कृषिमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी

Crop insurances : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 2020-21 हंगामातील थकीत नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीकडून टाळाटाळ होत आहे.

Swapnil Shinde

Dhananjay Munde News : राज्यातील पीक विमा योजनेंतर्गत सन २०२०-२१ खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या कंपन्यांकडे २२४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संप्तत व्यक्त केला. यावेळी त्यांनी विमा कंपन्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले.

सध्या राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. तर काही जिल्ह्यांध्ये अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पिक विमा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. त्यानंतर आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी मागील दोन वर्षांपूर्वीची थकबाकी भरपाईचा मुद्दा समोर आला.

पीक विमा योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये ६ विमा कंपन्यांपैकी ४ कंपन्यांकडे २२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती शेतकऱ्यांना देण्यास कोविड काळातील वेगवेगळी कारणे देत विमा कंपन्याकडून टाळाटाळ केली जात आहे. यावर मुंडे यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई द्यावी. ती ८ दिवसात न दिल्यास कंपन्यांवर कडक कारवाई करण्यास येईल, असा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharashiv Farmer Story: सरकारच्या ५ हजारांच्या अग्रिम मदतीवरुन नाराजी, शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची 'पट्टी'च केली मनी ऑर्डर

Integrated Farming: एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल : कुलगुरू खर्चे

Agriculture Irrigation Challenges: मोटारपंप बंदीच्या निर्देशांमुळे नवे संकट : किशोर वडेट्टीवार

Farmers Issue: कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा : खासदार अमर काळे

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

SCROLL FOR NEXT