Dairy Business Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : पावसामुळे डेअरी उद्योगाला दिलासा ; शेतकऱ्यांच्या खरेदीदराबाबत मात्र संभ्रम

Milk Rate : राज्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या चांगल्या पावसाने डेअरी उद्योगाला किंचित दिलासा मिळाला आहे

Team Agrowon

Procurement Milk : राज्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या चांगल्या पावसाने डेअरी उद्योगाला किंचित दिलासा मिळाला आहे. परंतु शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाला दर वाढवून मिळतील की नाही, याविषयीचा संभ्रम कायम आहे.

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, ‘‘गेल्या महिन्यापर्यंत राज्यात समाधानकारक पाऊस नव्हता. परंतु गेल्या पंधरवड्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची समस्या तूर्त कमी झाली आहे.

परिणामी, डेअरी उद्योगातील आधीचे भीतीचे वातावरण आता बऱ्यापैकी नाहीसे झाले आहे. चाऱ्याची तीव्र टंचाई तयार होईल, असे आता सध्या तरी वाटत नाही. मॉन्सून परतण्यापूर्वी राज्यात होत असलेला पाऊस दिलासादायक आहे.

पावसामुळे डेअरी उद्योगातील भीती दूर झालेली असली तरी त्यामुळे दुधाच्या दरात नेमके काय बदल होतील, याचा अंदाज डेअरी उद्योगाला आलेला नाही. श्री. कुतवळ म्हणाले, “गायीच्या दुधाच्या खरेदीची दरपातळी सध्या ३२ ते ३५ रुपयांच्या दरम्यान आहेत. आपापल्या खरेदी क्षेत्रातील मोठे खरेदीदार डेअरी किती दर देत आहे, ते पाहून सध्या छोटे डेअरीचालक दर देत आहेत.

‘अमूल’ची खरेदी समजा प्रतिलिटर ३४ रुपये दराने चालू असेल तर इतर डेअरी त्या भागात अमूल इतकाच दर देत आहेत. विशेष म्हणजे खरेदीदार संस्था एक असली तरी प्रत्येक जिल्ह्यात किंवा तालुक्यात निरनिराळे खरेदीदर सध्या दिले जात आहेत. हे का घडते आहे, याबाबत निश्‍चित कारण देता येणार नाही.’’

दूध खरेदीदर वाढण्याची शक्यता कमीच

शेतकऱ्यांच्या दुधाला जादा दर भविष्यात मिळतील की नाही, याविषयी डेअरी उद्योगाला खात्रीशीर अंदाज देता येत नाही. देशाच्या बाजारपेठेत सध्या दूध भुकटी व लोण्याचे दर कमी आहेत. त्यामुळे दूध खरेदीदराबाबत निश्‍चित अंदाज वर्तविता येत नसल्याचे डेअरीचालकांचे म्हणणे आहे.

बाजारात लोण्याचे यापूर्वीचे दर ४२५ रुपये किलोवरून ३४० रुपयांवर आले आहेत. तसेच दूध भुकटीचे दर ३३० रुपये किलोवरून २४० ते २५० रुपयांच्या आसपास आले आहेत. या दरात वाढ होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या दूध खरेदीदरांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता वाटत नाही, असे दूध उद्योगाला वाटते.

शासन यंत्रणा पुन्हा सुस्त

गायीच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर ३५ रुपये करण्याची सूचना शासनाने एक बैठक घेऊन केली होती. त्यानंतर दूध उद्योगाच्या समस्यांबाबत शासनाने कोणतीही बैठक घेतलेली नाही. दूध भेसळीचा भस्मासुर रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानुसार काही जिल्ह्यात या समित्या उत्तम कामे करीत आहेत. परंतु काही जिल्ह्यांमधील समित्यांचे अस्तित्व कागदोपत्री आहे, असे डेअरीचालकांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT