Kolhapur Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू

Flood Compensation : महापुराचा फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यातील ४४ गावांतील १ हजार ३६६ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : महापुराचा फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यातील ४४ गावांतील १ हजार ३६६ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत आहे. १ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे.

जुलैमध्ये कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा या चार नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी व ओढ्यांच्या काठासह सुमारे १० हजार ६०० हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान ऊस व भाजीपाल्याचे आहे. तालुक्यात कोबी, फ्लॉवर, मिरची, दोडका यासह अन्य पिकांचे व नवीन ऊस लागण केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

पंधरा दिवसांपासून कृषी महसूल विभागाकडून शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. आता प्रत्यक्षात तालुका कृषी कार्यालयात अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यात २४ हजार ६३४ शेतकऱ्यांची १० हजार ६०० हेक्टर जमीन बाधित झाली असून या नुकसानापोटी २५ कोटी ६७ लाख रुपये भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान तालुक्यात ४४ गावांत महापूर आल्याने १ हजार ३६६ कुटुंबांच्या घरात महापुराचे पाणी आले होते. त्यामुळे त्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले होते. यात ६८४ पूरग्रस्तांना ६८ लाख ४० हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. तर ६८२ कुटुंबांच्या खात्यात ६८ लाख २० हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्याची रक्कम कुटुंबाला प्रत्येकी १० हजार प्रमाणे १ कोटी ३६ लाख ६० हजार रुपये आहे.

शेती नुकसानीचा २५ कोटी ६७ लाखाचा प्रस्ताव

महापुरामुळे तालुक्यातील १० हजार ६०० हेक्टरमधील पिकांचा चिखल झाला. याचे पंचनामे पूर्ण झाले असून कृषी विभागाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. २५ कोटी ६७ लाख रुपये नुकसान झाल्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT