Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Panand Road : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाणंद रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने या रस्त्यावरील अतिक्रमण काढून ते मोकळे करण्याची योजना हाती घेतली आहे.

Team Agrowon

Dharashiv News : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाणंद रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने या रस्त्यावरील अतिक्रमण काढून ते मोकळे करण्याची योजना हाती घेतली आहे. या योजनेसाठी शरण पाटील फाउंडेशनने २९ पाणंद रस्त्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये लोकवाट्याची रक्कम दिल्याने पाणंद रस्त्यांच्या कामाला मोठी गती मिळत आहे.

शेती व्यवसायासाठी निसर्गाची जशी साथ हवी असते, त्या बरोबरच आडगळीला पडलेल्या रस्त्याच्या सुधारणांची गरज असते. वर्षानुवर्षे काटेरी झुडप्याने अन् अतिक्रमणाने दुरवस्थेतील शेत रस्ते, पाणंद रस्त्यामुळे शेतीतील माल, ऊस नेण्यासाठी अडचण ठरते आहे. दरम्यान, महसूल प्रशासनाकडे शेत रस्ते खुले करून देण्यासाठी अनेक प्रस्ताव दाखल आहेत.

तहसीलदार गोविंद येरमे यांनी आपल्या कार्यकाळात १०४ शेत रस्ते खुले करून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून गतीने प्रयत्न केले. या शेत रस्त्याची सातबारा उताराला नोंद झालेली आहे. महसूल विभागाने नकाशावरील २२ रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले असून प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.

त्यातील तुगाव, येणेगूर व गुगळगाव येथील प्रत्येकी दोन, सुंदरवाडी, भूसणी, कंटेकुर, कुन्हाळी, त्रिकोळी, गुगळगाव येथील प्रत्येकी एका रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत ही कामे येणाऱ्या काळात जलदगतीने होणे अपेक्षित आहे.

भाजपचे युवा नेते शरण पाटील यांनी शेतकऱ्यांशी निगडित विविध अडचणी प्रत्यक्षात सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान एक किलोमीटर अंतराच्या पाणंद रस्त्याच्या माती कामासाठी दीड लाख रुपये खर्च आहे. संबंधित शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा लोकवाट्याची रक्कम भरावयाची आहे.

परंतु शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता शरण पाटील फाउंडेशनने लोकवाट्याची रक्कम भरण्यासाठी पुढाकार घेतला. युवा नेते शरण पाटील यांच्या हस्ते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे यांच्या उपस्थितीत उमरगा तालुक्यातील आलूर, बेळंब, गुगळगाव, त्रिकोळी, सुंदरवाडी, तुगांव, कुन्हाळी, केसरजवळगा, भूसणी, कंटेकुर आदी गावातील २९ पाणंद रस्त्याचे भूमिपूजन झाले. दरम्यान लोहारा तालुक्यातील २५ पाणंद रस्त्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, त्या कामासाठीही लोकवाट्याची रक्कम देण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT