Hatnur  Agrowon
ॲग्रो विशेष

Hatnur Irrigation : हतनूरचे आवर्तन नदीत सोडा

Demand of Farmers to Release Water : ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणीटंचाई उद्‌भवू नये, यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्याची कार्यवाही केली जावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणीटंचाई उद्‌भवू नये, यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्याची कार्यवाही केली जावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.

२०२१, २०२२ मध्ये नदीत गावांची टंचाई दूर करण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यता दिल्यानंतर प्रशासनाने हतनूर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे २.९२ दशलक्ष घनफूट बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते.

यामुळे या गावांची पाणीटंचाईतून सुटका झाली होती. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले होते. यंदाही टंचाई वाढू शकते. पुढे तीव्र समस्या तयार होईल, यामुळे पूर्वीच नदीत पाणी सोडले जावे, अशी मागणी केली जात आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद, विदगाव, आवाड, खापरखेडा, तुरखेडा आणि नांद्रा खुर्द या गावांना पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी या गावांतील सरपंच व इतर ग्रामस्थांनी प्रशासन, पालकमंत्री यांच्याकडे मागील वेळेस हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.

या अनुषंगाने २.९२ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करून, हतनूर धरणातून हतनूर उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यास तातडीने मान्यता मिळाली होती. या गावांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश यंदाही दिले जावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पाहणी पथक तयार

प्रशासनाने बिगरसिंचन पाणी वापर संस्थेने आवर्तन कालावधीत पाहणी पथक व वाहन निरीक्षणासाठी तयार ठेवावे. आवर्तन कालावधीत पुरेसा कर्मचारी वर्ग निरीक्षणाकरिता उपलब्ध करून द्यावा, या अटींवर या गावांसाठी हतनूर उजव्या कालव्याद्वारे बिगरसिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबतचे आदेश दिले होते. असेच आदेश या वेळेसही दिले जावेत, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Worker Registration: बीड जिल्ह्यात ५८४५ ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण

Rain Mango Damage: पूर्वमोसमीचा तडाखा; आंब्यासह भाज्या मातीमोल

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

SCROLL FOR NEXT