MahaDBT Agrowon
ॲग्रो विशेष

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी पोर्टल’वरील रद्द अर्ज पुनर्स्थापित करा

Latest Agriculture News : मराठा आरक्षण काळात बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील इंटरनेट सुविधेअभावी ‘महाडीबीटी पोर्टल’वर आपोआप रद्द झालेले अर्ज पुन्हा पुनर्स्थापित करावेत, अशी मागणी कृषी विभागाने ‘महाआयटी’कडे केली आहे.

Team Agrowon

Mumbai News : मराठा आरक्षण काळात बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील इंटरनेट सुविधेअभावी ‘महाडीबीटी पोर्टल’वर आपोआप रद्द झालेले अर्ज पुन्हा पुनर्स्थापित करावेत, अशी मागणी कृषी विभागाने ‘महाआयटी’कडे केली आहे.

३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या काळात इंटरनेट बंद असल्याने शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करता न आल्याने अर्ज सिस्टिमवरून डिलीट झाले होते.

या संदर्भात विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांना पत्र लिहून ‘महाआयटी’ला सूचना द्याव्यात, अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली.

जालना आणि संभाजीनगर येथेही इंटरनेट सुविधा बंद होती. या काळात महाडीबीटी लाभासंदर्भात लाभार्थीस्तरावर निश्चित कालमर्यादा असते. यात कागदपत्रांबरोबर बिले अपलोड करणे अपेक्षित होते.

४ ते ६ नोव्हेंबर या काळातही ‘महाडीबीटी पोर्टल’ अत्यंत संथगतीने कार्यरत होते. त्यामुळे लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोडिंगसाठी एक ते दीड तास कालावधी लागत असल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले आहे.

...तोवर अर्ज रद्द करू नयेत

दरम्यान, पोर्टलवर ऑटो डिलीट झालेले अर्ज पुनर्स्थापित करून ‘महाडीबीटी पोर्टल’ जोपर्यंत योग्य पद्धतीने चालत नाही, तोवर अर्ज रद्द करू नयेत, असे संभाजीनगरच्या विभागीय कृषी सहसंचालकांना कळविण्यात आले आहे.

तसेच ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या काळातील इंटरनेट सुविधेतील व्यत्ययामुळे महाडीबीटी पोर्टलवरील ऑटोडिलिट झालेले अर्ज तत्काळ पुनर्स्थापित करून मिळावेत, यासाठी ‘महाआयटी’ला सूचना कराव्यात, अशी विनंती पत्रात विस्तार व प्रशिक्षण संचालक झेंडे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT