Maize Registration Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Registration : हमीदराने मका खरेदीसाठी ३० एप्रिलपर्यंत नोंदणी

Maize MSP : बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरडधान्य मका हमीदराने खरेदी करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरडधान्य मका हमीदराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवार (ता. ३०) पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.

मका खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यासाठी १६ खरेदी केंद्रांना मान्यता दिलेली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी अंजनी बुद्रुक केंद्र साखरखेर्डा, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्यूसर कंपनी देऊळगावराजा केंद्र सिंदखेडराजा,

नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड नांदुरा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था, चिखली, ऑर्गसत्व ऑर्गनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी देऊळगावराजा, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर केंद्र वरवट बकाल, बिबी फार्मर प्रोड्यूसर कंपनी बिबी या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा पणन अधिकारी यांनी सदर ठिकाणी मका खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड, खरीप २०२३-२४ चा सातबाऱ्याचा ऑनलाइन पीकपेरा, बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स, मोबाइल नंबर घेऊन कागदपत्रे स्कॅन करुन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात यावी. हाताने लिहिलेला सातबारा आणि खाडाखोड केलेली कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज त्याच दिवशी पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावयाचे आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन सातबारावरील मका पीकपेऱ्यापेक्षा जास्त क्षेत्रावर नोंदणी करण्यात येणार नाही. तसे झाल्यास यास केंद्र जबाबदार राहणार आहे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT