Maize Cultivation : पुणे विभागात साडे सात हजार हेक्टरवर मका

Maize Fodder Crop : उन्हाळी हंगामासाठी पुणे विभागात आत्तापर्यंत सात हजार ६०८ हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत.
Maize Cultivation
Maize CultivationAgrowon
Published on
Updated on

Pune News : उन्हाळी हंगामासाठी पुणे विभागात आत्तापर्यंत सात हजार ६०८ हेक्टरवर चारा पिके घेतली आहेत. प्रमुख चारा पीक असलेल्या मका पिकाच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली असून, त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात चाराटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतो.

मागील काही वर्षभरात दुग्ध उत्पादनात मोठी उलाढाल झालेली आहे. त्यामध्ये दुधाला बऱ्यापैकी मिळत असलेला बाजारभाव आणि विविध तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये विविध डेअरी उद्योगाच्या माध्यमातून दुग्धपूरक उद्योग वाढीस लागले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धउत्पादन व्यवसायात मोठी संधी चालून आली आहे. त्याचा आर्थिक फायदा होत आहे. मका पिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन त्याची गुणवत्ताही चांगली येते. मक्याच्या

Maize Cultivation
Maize Rate : मक्याची उपलब्धता कमी; दर सुधारण्याची शक्यता

चाऱ्याचा वापर करून मुरघास मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यात सुद्धा ओल्या चाऱ्याची उपलब्धता होते. पुणे विभागासह राज्यात जनावरांची संख्या जवळपास तीन ते साडे कोटी आहे.

मागील काही वर्षापूर्वी चारा टंचाईमुळे जनावरासाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. त्यामुळे पुन्हा तशीच स्थिती उद्भवू नये, म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहे.

Maize Cultivation
Maize Fodder : राधानगरी तालुक्यात वैरणीसाठी मका पिकाला पसंती

त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मका पिकांसारख्या चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा फायदा बहुतांशी शेतकरी घेत चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात.

दाण्याच्या उत्पादनासाठी मक्याची लागवड

पुणे परिसरातील अनेक शेतकरी मक्याचे दाणे काढण्यासाठी मोठ्या आकाराच्या कणसाच्या मक्याची लागवड करतात. त्यासाठी किमान तीन ते चार महिने लागतात. मक्याचे कणसे काढणीच्या अवस्थेत आल्यानंतर फक्त कणसे काढून कंपनीला, मार्केटमध्ये विकतात. त्यातून चांगले उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी याकडे वळत आहेत. त्यामुळे मका लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते.

पुणे विभागात पीकनिहाय झालेली पेरणी ः हेक्टरमध्ये

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- लागवड झालेले क्षेत्र--- टक्के

नगर -- १,५३३ -- १,६३१ -- १०६

पुणे -- १,७०५ -- २,४८८ -- १४६

सोलापूर --- ४,३७० -- ४,३८९ -- ८०

एकूण -- ७,६०८ --- ७,६०८ -- १००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com