Fraud Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

Gangakhed Society Scam: गंगाखेड तालुक्यातील १५ गावांतील एकाच कुटुंबातील सदस्यांनी विविध संस्था स्थापन करून सहकार धोरणाचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर कारवाई करत विभागीय सहनिबंधकांनी ४२ संस्थांची नोंदणी रद्द केली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News: एकीकडे ‘सहकारातून समृद्धी’ या उक्तीनुसार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे केले जात असतानाच दुसरीकडे ‘सहकारा’चीच फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विभागाने हा प्रयत्न हाणून पाडला असून, एकाच घरातील सदस्यांची नावे असलेली तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे नावनोंदणी केली असल्याचे समोर आले आहे. गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील १५ गावांतील ४२ संस्थांची नोंदणी विभागीय सहनिबंधकांनी रद्द केली आहे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, अकोली येथील संचालक वामन सखाराम पोले यांनी सहकार विभागाकडे धाव घेतली होती. त्यानुसार जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहभाग घेता यावा या उद्देशाने २०११ मध्ये अनेक सेवा संस्थांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

संस्था नोंदणीदरम्यान एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची जसे की पत्नी संस्थेची चेअरमन तर पती दुसऱ्या संस्थेचे चेअरमन, तसेच आई-वडीलही तिसऱ्या संस्थेचे चेअरमन अशा संस्थांची नोंदणी केली होती. एका कुटुंबातील सदस्य नसावेत ही अट असताना अनेक संस्थांनी ‘आम्ही विभक्त कुटुंबांतील सदस्य आहोत ’ असे खोटे शपथपत्र दिले.

संस्था नोंदणी केलेल्या गावांमध्ये गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी, अंतरवेली, पिसेवाडी (३ संस्था), उखळी, कड्याची वाडी, कातकरवाडी, पोखर्णी तांडा, पिंपळदरी (३), पोखर्णी वा. (२), बडवणी (३), गंगाखेड (३), वागदरी (५), तांदळवाडी (४), गोदावरी तांडा, सेलमोहा, वागदेवाडी, वागदरा, बोर्डा, डोंगरगाव, आनंदनगर, सिरसम, मुळी, कोद्री (३ संस्था), बनपिंपळा या गावांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी सुनावण्या घेऊन कलम २१ अ, पोटकलम १ नुसार या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली.
शरद जरे, विभागीय सहनिबंधक, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT